Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२६

*धाराशिव येथील मृद व. जलसंधारण विभागाचे अधिकारी सलग दोन वेळा सुनावणीस गैरहजर?*

 *तुळजापूर-- प्रतिनिधी* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


धाराशिव - मृद व जलसंधारण विभाग, धाराशिव येथे माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 19 (1) अपील बाबत आज दिनांक 26/11/2026 रोजी दुपारी 1.00 वाजता सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र या सुनावणीस अधिकारीच गैरहजर राहिले.

ही दुसरी वेळ आहे की अधिकारी सुनावणीसाठी हजर राहिले नाहीत. पहिली सुनावणी दि. 13/11/2026 रोजी ठेवली होती, ती क्षेत्रीय दौरा असल्याचे कारण सांगून पुढे ढकलण्यात आली होती. आज पुन्हा सुनावणी असताना अधिकारी आले नाहीत.

अर्जदार  तांबोळी मकबुल अल्लाउद्दीन, एस.टी. कॉलनी तुळजापूर हे वेळेत हजर होते. सामान्य नागरिकाने वेळ काढून, खर्च करून यायचे आणि अधिकारीच यायचे नाहीत, हा काय न्याय आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.

अधिकाऱ्यांच्या या गैरहजेरीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करणार असून, राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील करणार असल्याचे मकबुल तांबोळी यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा