कोल्हापूर -प्रतिनिधी
प्रा.विश्वनाथ पाटील
मो.9975 978 073
कोडोली ( ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) दिनांक :15: येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रांगणात येथील माजी सैनिक अशोक गणपती मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालय आणि यशवंत उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील होते. यशवंत उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य पंडित साळोखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. चंदाराणी उमेश पाटील यांनी प्रास्ताविकात पाहुण्यांची ओळख करून दिली. 12 वीच्या विद्यार्थिनी अंकिता शेटे आणि गौरी खवरे यांनी सूत्रसंचलन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा