गणेशगाव----प्रतिनिधी
नुरजहाँ ---शेख.
मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या संकलपनेतून प्रेरणा घेऊन लवंग शाळेत 96000 रुपयांच्या 16 सायकली गावकऱ्यांनी दिल्या, 7000 रुपयांच्या खुर्च्या, 28000 रुपयाची विद्यार्थी बक्षिसे, 11000रुपयांची ग्रंथालयास पुस्तके,10,000 रुपयांची लाल माती अशाप्रकारे 152000 चा शैक्षणिक उठाव करण्यात आला.
यामध्ये सज्जन दुरापे 41000, बिभीषण भोसले ,40,000 निशांत दादा पाटील 25000रुपये, प्रशांत पाटील 10,000 रुपये, मधुकर वाघ 10,000 सदाशिव अवताडे 6000व इतर काही मिळून 152000रुपये जमा झाले. आणि या रक्मेचा सदुपयोग करून गावकरी , शिक्षक व शिक्षण अधिकारी यांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.असा आदर्श प्रत्येक गावाने निर्माण करावा शाळेच्या गरजांकडे दुर्लक्ष न करता अवश्यक साधानसामग्री गावकरी वर्गणीतून भागवत आहेत. अशाच प्रकारची वर्गणी सांगली पुर ग्रस्थाना रिलीफ फंडात शाळेने गावच्या मदतीने केली होती.
या कामी शाळेतील सर्व शिक्षक व मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय लोखंडे सर यांनी परिश्रम घेतले. याकामी गटशिक्षण अधिकारी धनंजय देशमुख साहेब यांचे मार्ग दर्शन लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा