अकलूज -----प्रतिनिधी
केदार --लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी
मो. --9890 095283
अकलुज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते - पाटील इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च, शंकरनगर अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामधील प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीमध्ये नविन प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ दि . २२/०८/२०२३ रोजी मोठया उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, उपविभागीय कार्यालय, सोलापूरमधील विशेष कर्तव्य अधिकारी डॉ. रमेश प्रभाकर काटे हे उपस्थित होते. स्वागत समारंभास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . प्रविण ढवळे , कार्यालयीन अधिक्षक , सर्व विभागाचे विभागप्रमुख शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात काकासाहेब व अक्कासाहेब यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीच्या विभागप्रमुख प्रा. सौ. सुजाता रिसवडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मुख्य अतिथी, विद्यार्थी व पालकांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत केले. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये त्यांनी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणा - या जयसिंह शिक्षण सन्मान योजना व विद्यावेतन योजनांबद्दल माहिती दिली व सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालय हे उदयोजक निर्माण करणारे महाविद्यालय म्हणून ओळखले जाईल अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ . रमेश काटे यांनी मनोगतामध्ये आपले अनमोल विचार मांडले. यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर आपले छंद जोपासावे, सध्याच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी टेक्नॉलॉजीच्या बाबतीत अद्यावत राहिले पाहिजे, तसेच विद्यार्थ्यांनी मनामध्ये कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वास जोपासला पाहिजे असे सांगीतले.
कार्यक्रम यशस्विरीत्या पार पाडण्यासाठी सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा . सागर फुले यांनी तर आभार प्रदर्शन प्रा . संजय झंजे यांनी केले .
डॉ . प्रविण ढवळे
प्राचार्य
सहकार महर्षि शंकररराव मोहिते - पाटील इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च, शंकरनगर - अकलूज.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा