Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३

अकलूज येथे ईद-ए-मिलाद (पैगंबर जयंती )आणि अनंत चतुर्दशी (गणेश विसर्जन ) च्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाची बैठक संपन्न- 1 आॕक्टोबर ला जयंती साजरी करण्याचा निर्णय--

 अकलूज येथे ईद-ए-मिलाद (पैगंबर जयंती )आणि अनंत चतुर्दशी (गणेश विसर्जन ) च्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाची बैठक संपन्न- 1 आॕक्टोबर ला जयंती साजरी करण्याचा  निर्णय--


संपादक----हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.-9730 867 448

                     यंदा मुस्लिम धर्माचे संस्थापक प्रेषित "हजरत महंमद पैगंबर" यांची जयंती( ईद-ए-मिलाद) आणि हिंदू बांधवांचा( आनंद चतुर्दशी) गणेश विसर्जन एकाच दिवशी येत असल्यामुळे अकलूज परिसरातील हिंदू मुस्लिम बांधवांचा नेहमीचा " हिंदु मुस्लिम भाई भाई "चा सलोखा कायम अबाधित राहावा या उद्देशाने मुस्लिम समाजाने निर्णय घेतला आहे की गुरुवार दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी येणारी पैगंबर जयंती( ईद-ए-मिलाद) त्यादिवशी साजरी न करता रविवार दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी साजरी करण्याचे बैठकीत ठरले आहे तसेच अकलूज आणि पंचक्रोशीत होऊन गेलेले सोफी संत हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी ( र.अ. )यांचा लुमेवाडी ता.इंदापूरा येथील ऊरुस दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी संपन्न होत असून त्या अनुषंगाने सालाबाद प्रमाणे दिनांक ६ ऑक्टोबर 2023 रोजी काझी गल्ली अकलूज येथून संदलची मिरवणूक निघत असते त्या संदल मिरवणुकी संदर्भात बैठक संपन्न झाली.

या बैठकीस अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीप रतन गायकवाड तसेच शिवकुमार मदभावी आणि समाजातील युवक आणि वृद्ध मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते



याप्रसंगी बोलताना अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड म्हणाले की, कोणत्याही महापुरुषांची जयंती साजरी करताना त्याने दिलेल्या आदर्श ,उपदेशाचे पालन करत जयंती साजरी केली तर आणि तरच जयंती साजरी केल्याचे सार्थक होईल त्यामुळे कोणत्याही समाजातील युवकांनी डीजे ,डॉल्बी असे वाद्य महामानवांच्या जयंतीत न लावता पारंपारिक पद्धतीचे वाद्य लावून साजरी केली तर त्याचे सौंदर्य वाढून शोभा येते तरी माझी युवकांना विनंती आहे की आपण डॉल्बी अथवा डीजे लावण्याचा हट्ट करू नये तसेच या डॉल्बी डीजे मुळे अबाल वृध्दांना किती त्रास होतो याचेही भान राखणे गरजेचे आहे तसेच 1 जानेवारी 2024 पासून माझा स्वतःचा अकलूज पोलीस स्टेशनच्या अंतर्गत डीजे डॉल्बीला विरोध असणार आहे असा इशारा दिला.


तसेच पैगंबर जयंतीनिमित्त तरुणांनी डॉल्बी डीजे लावण्याचा हट्ट करण्यापेक्षा मागील आठवड्यात सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथे दोन निष्पाप लोकांना समाजकंटकामुळे बळी पडावे लागले ज्यामध्ये नूरुल हसन हा त्यांच्या आई-वडिलास एकुलता एक मुलगा होता त्याची पत्नी सात महिन्याची गरोदर असून त्या कुटुंबाचे जीवन अंधकारमय झाले आहे ज्या कुटुंबातील युवक बळी पडला त्या कुटुंबात वर आज मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांना अद्याप शासनाकडून कोणत्याही मदत जाहीर झालेली नाही किंवा लोकप्रतिनिधींनी अद्याप त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन ही केले नाही. हे दुर्दैवी आहे त्यामुळे समाजातील युवकांना कळकळीची विनंती आहे की आपण प्रेषितांची जयंती साजरी करत आहात आणि प्रेषितांची शिकवण आहे कि जे रंजले गांजलेले आहेत आथवा गरीब आहेत त्यांना प्रथम मदत करा . तिकडे एक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे एखादे कुटुंब उद्ध्वस्त झाले असताना डीजे लावून वायफळ खर्च करुन विक्षिप्त पणे नाचणे हे प्रेषितांना मान्य नाही आणि त्यांच्या शिकवणीविरुध्द आहे त्या पेक्षा डीजे ला दिली जाणारी रक्कम पीडित कुटुंबास मदत म्हणून दिली तर खऱ्या अर्थाने एका महापुरुषाची जयंती साजरी केल्याचे सार्थक होईल असे वृद्ध आणि जाणत्या वडीलधाऱ्या माणसातून बोलले जात आहे.

त्याच प्रमाणे पुसेसावळी जि. सातारा येथे झालेल्या दंगलीमध्ये निष्पाप दोघांचा बळी गेला आणि अनेकांचे संसार उध्वस्त झाले तसेच त्यांना अद्याप शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत अथवा सांत्वन केले गेले नाही त्या निषेधार्थ दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी अकलूज शहर मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे त्याकरिता बहुसंख्येने मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन ॲड. वजीर शेख यांनी केले आहे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा