संपादक---- हुसेन मुलाणी
टाइम्स - 45 -न्युज मराठी
मो.9730 867 448
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित महिला आरक्षण विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आले होते. या विधेयकावर सोनिया गांधींसह, स्मृती इराणी, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेकांनी चर्चा केली. जवळपास सर्वांनीच या विधेयकाला समर्थन दिलं असून अखेर आज लोकसभेत हे विधेयक संमत करण्यात आलं आहे. त्यामुळे, आता राज्यसभेत या विधेयकाची परिक्षा होणार आहे. मात्र, राज्यसभेत मोदी सरकारला बहुमत नसले तरी या विधेयकाला मिळालेल्या समर्थनावरुन हे विधेयक तिथेही मंजूर होईल, असेच दिसून येते.
लोकसभेत हे विधेयक मांडल्यानंतर विधेयकाच्या बाजुने ४५४ जणांनी मतदान केले. तर, केवळ दोन जणांनी महिला आरक्षण विधेयकास स्पष्टपणे विरोध दर्शवला आहे या विधेयकाच्या मतदानावेळी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदीही संसद सभागृहात उपस्थित होते. तर, गृहमंत्री अमित शहा, राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गजांनी विधेयकाच्या चर्चेत सहभाग घेत समर्थन केलं.
,सौजन्य ;--
माहिती सेवा ग्रुप ,पेठवडगाव.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा