💐💐💐💐💐💐🌺🌺🌺🌺🌺💐💐💐💐💐💐💐
टाइम्स 45 न्युज मराठी नेटवर्क
देविदास सिद्राम बाबर रा पंढरपूर वय 45 यांचे आज सकाळी टप्पा ते दसूर पाटी रस्त्यावर अपघाती निधन झाले आहे ते पंढरपूर येथून दसूरला निघाले होते हायवा ट्रक व मोटारसायकल यांची समोरासमोर धडक झाल्याने देविदास बाबर यांचे जागेवरच निधन झाले त्यांच्या जवळचा मोबाईल अपघातात चुराडा झाला सकाळी दहा वाजता अपघात झाला पण त्यांचा ठावठिकाणा लवकर पोलिसांना लक्षात आला नाही त्यांच्या खिशात लहान डायरी मध्ये पंढरपूर येथील पत्ता होता तेथे त्यांच्या घरी मुलगा पत्नीला कळवण्यात आले पंढरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांचे शवविच्छेदन करुन त्यांचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले रात्री आठ वाजता पंढरपूर येथील वैकुंठ मोक्षधाम येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले पत्रकार बी टी शिवशरण यांचे ते मावस मेव्हणे होते




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा