संपादक---- हुसेन मुलाणी
टाइम्स - 45 -न्युज मराठी
मो.9730 867 448
काक्रंबा ता.तुळजापूर येथील जगदंबा गणेश तरुण मंडळाच्या श्री ची महाआरती धाराशिव जिल्ह्याचे शिवसेना नेते माजी नगराध्यक्ष नंदूराजे भैय्या निंबाळकर तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज भैय्या पाटील व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काका धूरगुडे या प्रमुख मान्यवरच्या उपस्थित संपन्न झाली तसेच सायंकाळी धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी हजेरी लावून गणरायाचे आरती केली व त्यानंतर गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली
नऊ दिवसाच्या गणेश उत्सव निमित्त मंडळाच्या वतीने विविध स्पर्धा भरवण्यात आलेल्या होत्या या सर्व स्पर्धकांना उपस्थित प्रमुख पाहुण्याःच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले व छोट्या बाल कलाकारांच्या विज गाण्यावर डान्स लेझीम असे अनेक कार्यक्रम घेण्यात आले व गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला यावेळी मंडळाचे अध्यक्ष चेतन बंडगर उपाध्यक्ष नागेश वगरे, आकाश म्हेत्रे ,साईसागर, योगेश वगरे , पवन वाघमारे ,गणेश स्वामी रोहित म्हेत्रे , रंगनाथ झाडे, अक्षय राऊत ,हणमंत सरक, शिवाजी गवळी , सारंग कानडे, गोटू वाघमारे, योगेश म्हेत्रे, गणेश वगरे व मंडळाचे सर्व सदस्य पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा