विशेष प्रतिनिधी अकलूज
कासिम--- मुलानी
टाइम्स 46 न्यूज मराठी
अकलूज येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत सह्याद्री नगर अंगणवाडीत दिनांक 25 /9/ 23 रोजी सकाळी 11 वाजता पूरक पोषण आहार अभियान कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी परिसरातील बहुसंख्य महिला नागरिकांची उपस्थिती होती . कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माळीनगर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पर्यवेक्षिका दिपाली माने उपस्थित होत्या या प्रसंगी त्यांनी "महिलांमध्ये सर्वात जास्त आढळणाऱ्या अँनिमिया आजाराची व त्या आजारावर मात करण्यासाठी पूरक पोषण आहाराची माहिती" देऊन "महिलांनी गरोदरपणात बालकांची घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले सह्याद्री नगर अंगणवाडी शिक्षिका
नंदिनी गायकवाड यांनी "घरी उपलब्ध असणाऱ्या अन्नधान्यापासून बालकांचा पोषक आणि पौष्टिक आहार देऊन त्यांची शारीरिक व मानसिक वाढ चांगल्या प्रकारे कशी करता येईल? तसेच टी एच आर पासून वेगवेगळ्या पाककृती कशा कराव्या? सखोल माहिती दिली यावेळी सह्याद्री नगर मधील महिलांनी टी एच आर पासून वेगवेगळ्या पाककृती तयार करून आणल्या होत्या .अंगणवाडी मदतणीस सुमालिया काझी यांनी सहकार्य केले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे सी.डी.पी.ओ बालाजी अल्लडवाड आणि महाळूंग बीट २ च्या पर्यवेक्षिका रब्बाना शेख यांनी मार्गदर्शन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा