Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ११ सप्टेंबर, २०२३

भव्य नोकरी महोत्सव व जॉब कार्ड वाटप संपन्न

 धाराशिव जिल्हा ( उ.बा.ठा) यांच्या वतीने भव्य नोकरी महोत्सव व जॉब कार्ड वाटप संपन्न


संपादक----हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.-9730 867 448

                  धाराशिव ( उस्मानाबाद) जिल्हा शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) यांच्या वतीने भव्य नौकरी महोत्सव व जॉब कार्ड वाटपदि.10 सप्टेंबर 2023 रोजी संपन्न झाला .


एक काळ असा होता की लोकांना शाळेतूनच नोकरी मिळाली आणि ते निवृत्त होईपर्यंत त्यांनी तीच नोकरी केली. ते दिवस चांगले गेले. आज, तरुणाईला नवीन नोकरीच्या संधी शोधण्यासाठी खूप धावपळ करावी लागते. ही युककांची समस्या लक्षात  

 घेऊन धाराशिवचे कर्तव्यदक्ष सर्व सामान्य नागरिकांचे तारणहार खासदार .ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि धाराशिव चे लोकप्रिय आमदार कैलास दादा पाटील यांच्या संकल्पनेतून दि. 10 सप्टेंबर 2023 रोजी धाराशिव येथे भव्य नौकरी महोत्सव आणि जाॕब कार्ड चे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या नौकरी महोत्सवास जिल्हाभरातून तरुणांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.



सध्याची मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता आणि कष्टाने शिक्षण घेऊनही तरुणांच्या हाताला काम न मिळणे ही खेदाची बाब आहे गेली अनेक वर्ष शासकीय नौकर भरतीच बंद आसल्याने तरुणामध्ये सरकारा विरोधात प्रचंड नाराजी व निराशा पसलेली आहे हे लक्षात घेऊन त्या अनुषंगाने खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि आमादार कैलासदादा पाटील यांनी या महोत्सवाचे आयोजन केले त्याबद्दल त्यांचे युवकांनी मनापासून आभार व्यक्त केले आणि या नौकरी महोत्सव कार्यक्रमात असंख्य तरुणांच्या चेहर्‍यावरील समाधान पाहून आनंद वाटला त्यामुळे लोकप्रतिनिधीं कडून तरुणाईच्या ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या खासदार व आमदार यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुर्ण करताना दिसत आहात ... त्यामुळे प्रत्येक मतदार संघात युवकांच्या समस्यांची जाण ठेवणारे अशा कर्तव्य दक्ष लोकप्रतिनिधींची गरज असून ही काळाची गरज आहे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा