अकलूज येथे कोळेकर महास्वामीजी व वाईकर महास्वामीजी यांची दिव्य गुरू तुला
संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
" गुरु माझं गणगोत
गुरु हीच माऊली
गुरु स्पर्श दुर करी
दुःखाची सावली"
शिव निर्णय संघटना, महाराष्ट्र वीरशैव सभा, वीरशैव महिला भजनी मंडळ, व समस्त वीरशैव लिंगायत समाज अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण मासानिमित्त गुरुनिर्वाण रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी व महादेव शिवाचार्य वाईकर महास्वामीजी यांची गुरुवार 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक ५:३० वाजता महादेव मंदिर अकलूज येथे भव्य दिव्य गुरू तुला व गुणवंताचा सत्कार सोहळ्याचे आयोजन केले असल्याचे शिवनिर्णय संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष उत्कर्ष शेटे यांनी सांगितले
सदर कार्यक्रमासाठी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे चेअरमन मा.जयसिंह मोहिते पाटील साहेब,शिवामृत दूध संघाचे चेअरमन मा.धैर्यशील मोहिते पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.संग्रामसिंह मोहिते पाटील माजी सरपंच मा.शिवतेजसिंह मोहिते पाटील व इतिहासाचे अभ्यासक मा.प्रशांत सरूडकर या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे तसेच या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य महेश शेटे नातेपुते यांनी केले आहे तरी शिवभक्तांनी व वीरशैवसमाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंगेश ( नाना) शेटे यांनी केले आहे.यावेळी अशोक ज.शेटे,महादेव पाटील सर,उमेश गुळवे,गणेश राजेंद्र शेंडे,नवनाथ बेलपत्रे,नरुळे,महेश डिकोळे,ऋषीकेश कानडे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा