संपादक --हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी चे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील, यांना माढा लोकसभा मतदारसंघाची खासदारकी ची उमेदवारी मिळावी आणि त्यांना खासदार करायचेच असा कार्यकर्त्यांनी चंग बांधला असून मागील दोन तीन महिन्यापासून सोशल मीडियावर या संदर्भात दररोज एका पेक्षा एक पोस्ट वायरल होत आहेत मागील चार-पाच दिवसांपूर्वी अकलूज येथील मुस्लिम कार्यकर्ते अजमेर येथील हजरत ख्वाजा मैनुद्दीन चिस्ती हसन संजेरी( गरीब नवाज) यांच्या दर्शनासाठी गेले आहेत तेथे गेल्यानंतर त्यांनी ख्वाजा मैनुद्दीन चिश्ती (गरीब नवाज) दर्गाचे विश्वस्त व सेवक अलिजनाब ताहेर भाई यांना विनंती केली की आमचे नेते "धैर्यशील मोहिते पाटील "यांना उमेदवारी मिळावी त्या अनुषंगाने आपण गरीब नवाज यांच्या चरणी (खास दुआ) प्रार्थना करावी त्यांच्या या शब्दाचा मान राखून विश्वस्त अलिजनाब ताहेरभाई यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदार संघाची उमेदवारी मिळावी म्हणून धैर्यशील मोहिते पाटील यांना लाईव्ह व्हिडिओ कॉल करून व्हिडिओ कॉल द्वारे प्रार्थना केली आणि या प्रार्थनेचे तालुक्यात चर्चा होत आहे.
या प्रसंगी अजमेर येथे दर्शनासाठी गेलेले तनवीरभाई तांबोळी ,जब्बारभाई तांबोळी ,आसिफभाई कुरेशी,अमिन तांबोळी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा