विशेष ,प्रतिनिधी
कासिम मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
सर्व जगाला अमन ,शांती, एकता, बंधुताचा संदेश देणारे जागतिक शांती दूध प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी काटगाव ता. तुळजापूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
प्रारंभी ईद-ए-मिलाद( पैगंबर जयंती )निमित्त काटगाव येथील जामा मशीद येथून जुलुस (मिरवणुक) ला प्रारंभ झाला हा जुलुस पुढे हजरत सय्यद वली यांच्या दर्ग्यात गेल्यानंतर तेथे फुलाची चादर चढवून फातेहाख्वानी करण्यात आली या जुलुस मध्ये प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जयजयकार करत" नारे तकबीर-- अल्लाहू अकबर "नारे रिसालत-- या रसूलुल्ला "
"सरकार की आमद --मरहाबा" " "बच्चा बच्चा कहेता है --नबी हमारा सच्चा है" इत्यादी (नारे) घोषणांनी काटगाव परिसर दुमदुमुन गेला त्यानंतर जुलूस परत जामा मस्जिद येते आल्यानंतर निलेगाव ता..तुळजापूर येथील" मौलाना मोहम्मद सद्दाम हुसेन साहब "यांचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर मार्गदर्शक प्रवचन बयान झाले तत्पूर्वी लहान मुलांनी प्रेषितांबाबत नातशरीफ पठण केले त्यानंतर सर्व उपस्थितांना प्रसाद वाटप करण्यात आला या जुलुस मध्ये अबाल वृद्धासह युवक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा