Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १४ सप्टेंबर, २०२३

पिंपरी बुद्रुक येथील महादेवाच्या पिंडीची व लिंगाची विधीवत प्राणप्रतिष्ठा

 पिंपरी बुद्रुक येथील महादेवाच्या पिंडीची व लिंगाची विधीवत प्राणप्रतिष्ठा


इंदापूर तालुका......
प्रतिनिधी 

एस. बी. तांबोळी, 

मोबाईल -8378081147

                     पिंपरी बुद्रुक येथील शंभो महादेव पिंड व लिंगाची प्राणप्रतिष्ठा विधीवत करण्यात आली. गावातील पाच प्रतिष्ठित जोडप्यांना यजमान पत देण्यात आले होते. तर होम हवन करून विधीवत स्वरूपात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

     पिंपरी बुद्रुक (ता.इंदापूर) येथील भीमा नदी काठावरील महादेव मंदिरामध्ये शंभू महादेवाची पिंड व लिंगाची प्राणप्रतिष्ठा विधीवत स्वरूपात करण्यात आली. यासाठी सौ उज्वला व विनायक पांडुरंग बोडके, सौ बायडा व अर्जुन पडळकर, सौ बायडा व अनिल भगवान लावंड, सौ प्रियंका व महेश हरिभाऊ सुतार, सौ वैशाली व र्धमान आजिनाथ बोडके या यजमान जोडप्यांच्या हस्ते होम हवनद्वारे विधीवत पुजा करण्यात आली.

    सदर लिंगाच्या व पिंडीच्या प्राण प्रतिष्ठापनेचे पौराहित्य प्रकाश काकडे व प्रविण काकडे यांनी केले. सदर कार्यक्रमास गावातील शंभू भक्त, भाविक व नागरीकांनी उपस्थित राहत महाप्रसादाचा आस्वाद लुटला. ग्रामस्थांच्या वर्गणीतून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

फोटो - पिंपरी बुद्रुक येथील महादेव मंदिरात पिंडीची व लिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा