समस्त हिंदू ,मुस्लिम बांधवांच्या सामाजिक ,सांस्कृतिक आणि राजकीय, क्षेत्रातील मित्र हितचिंतकासाठी "धोक्याची घंटा"
--इक्बाल मुल्ला --सांगली
संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
कुंक "लाल" असते ,आणि रक्ताचा "रंग" ही लालच असतो , एखाद्या निरपराध तरुणाची सामूहिक हत्या करणारे , अबला महिलेला विधवा बनवत त्या महिलाचे कुंकू पुसणारे , एक वर्षाच्या लहान बाळाला अनाथ करणारे , "मानवजातीला" कलंक आहेत .
ही "दंगल" म्हणजे राजकीय "लाभासाठी" ,विशिष्ठ पक्षासाठी सॉफ्टकॉर्नर मिळवण्यासाठी,"मानसिक -भावनिक ,सामाजिक एकोप्याचे ध्रुवीकरण करण्यासाठी हा "बालिश" खटाटोप" आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे .
मुस्लिम शांतिदूत आहेत .घडणारे प्रकार व त्यामागील मास्टरमाइंड याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळे ते "चुकीची कृती" करून 2024 च्या निवडणुकीत जातीयवादी पक्षाला याचा फायदा मिळवून देणार नाहीत अशी "अपेक्षा" आहे .
"इतिहासात" पुस्तकात आपण वाचले आहे की मुंगीलाही "राग" असतो ,बलाढ्य हत्तीचे ती नामोहरण करू शकते , "क्रिया" ला प्रतिक्रिया असते .त्यामुळे शांतता -सहिष्णुता जपणाऱ्यांच्या सहनशीलतेचा "अंत " त्यांनी पाहू नये .
फेक आयडी च्या माध्यमातून उलट -सुलट काहीही करता येते .त्यामुळे गैरसमजातून नाहक एखाद्याची हत्या करण्याचा ,घरे - दुकाने जाळण्याचा , - कायदा - सुव्यवस्था पायदळी तुडवण्याचा "अधिकार" यांना कोण दिला ?? पोलीस -प्रशासनाची ही पायमल्ली नाही का ??
स्थानिक नागरिक गुण्यागोविंदाने* राहत असताना ,भाडोत्री" गुंड आणून "दंगल सदृश्य" परिस्थिती निर्माण करणारे "मानवतेचे" शत्रू आहेत .
छत्रपती शिवरायांचा - शाहू -फुले - आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे. जेथे पवित्र कुराणाचा आदर करणारे ,मुस्लिमांच्या साठी मस्जिद बांधणारे माझे आदर्श राजे शिवाजी महाराज आहेत .तर दुसरीकडे पहिल्या मुस्लिम महिला " फातिमा यांना "पुण्यात " भिडे वाडा येथे शिक्षित करणारे क्रांतिकारी महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले हे आहेत.
कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही त्यामुळे राजकीय अथवा सर्वसामान्य कोणीही असो त्या दोषीं असणाऱ्यांना कडक शिक्षा करून , भविष्यात असे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घेऊन, शांतता - सदभाव प्रस्थापित होण्यासाठी पोलीस -प्रशासन यांना "सहकार्य" करावे . जे सूत्रधार असतील त्यांची नार्को टेस्ट करून मृत व जखमी तरुणांना "न्याय" द्यावा .
रमजान ईद व बकरी ईद या सणाला आवर्जून बोलविणाऱ्या माझ्या मुस्लिम बांधवाना आणि दीपावली दिवशी "फराळाची" मेजवानी करण्यासाठी अगत्याने घरी घेऊन जाणाऱ्या माझ्या मराठा बांघवांना सातारा मधील सामूहिक अत्याचार "धक्कादायक" आहे .कारण एका "ताटात" जेवण जेवणाऱ्या व गणपती - मोहरम हे सर्व सण एकत्रित "बंधुभावाने" साजरे करणाऱ्या , सर्वधर्मसमभाव जपणाऱ्या माझ्या समस्त हिंदू -मुस्लिम बांधवांच्या सामाजिक -सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील मित्र -हितचिंतकांसाठी ही "धोक्याची घंटा" आहे .आपण वेळीच सावध राहिले पाहिजे .
28 तारखेला - ईद ए मिलाद हा मुस्लिमांचा सण आहे .आणि त्याच दिवशी श्री गणेशोत्सव मंडळाची " विसर्जन मिरवणूक देखील आहे . माझ्या मराठा बांधवाना त्रास होऊ नये ,मिरवणुकीत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मुस्लिम बांधवानी मिरजेत "ईद ए मिलाद" ही 2 दिवसांनी साजरी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला ." हिंदू -मुस्लिम भाई -भाई " चा नारा देत ,सर्वधर्मसमभाव खऱ्या अर्थाने पाळणाऱ्या मुस्लिम समाजाचे जाहीर कौतुक करायला हवे .असो ..आज गणेशोत्सव व ईद ए मिलाद च्या निमित्ताने जो सांस्कृतिक मिलाफ झाला आहे .तो "अबाधित" राहावा ही अपेक्षा ! सर्वधर्मसमभाव हा आपला पाया आहे ,"कायदा - पोलीस प्रशासन " हे "जनतेसाठी" आहे . त्यामुळे या संस्थांचा सर्वानी सन्मान करावा ही विनंती !
जय हिंद - जय महाराष्ट्र !
इकबाल मुल्ला ( पत्रकार ) संपादक -सांगली वेध ,
संपादक -वेध मीडिया न्यूज ,सांगली.
मोबाईल - 8983587160






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा