इंदापूर तालुका..... प्रतिनिधी
एस. बी. तांबोळी,
मोबाईल-8378081147
सुतारवस्ती ( पिंपरी बुद्रुक ) येथील गणराज मित्र मंडळाच्या वतीने मुस्लिम जोडप्याच्या हस्ते गणरायाची आरती करून सर्वधर्म समभावाचे ज्वलंत उदाहरण निर्माण केले आहे. प्रथमताच गणपतीची आरती मुस्लिम दाम्पत्याला दिल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
सुतारवस्ती ( पिंपरी बुद्रुक ) येथील गणराज मित्र मंडळाची आरती मुस्लिम बांधव सौ. दिलशाद व शौकत गुलाब मुलाणी तसेच सौ. शहानूर व रशिद मुलाणी दाम्पत्याच्या हस्ते करण्याचा बहुमान समस्त सुतारवस्ती ग्रामस्थ व महिला भगिनींच्या वतीने देण्यात आला. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. देशात जातीय दंगली घडवून काही समाजाला टार्गेट केले जात असताना येथे मात्र सर्वधर्म समभाव जपण्याचे काम करण्यात आले आहे.
यावेळी हरिभाऊ सुतार, भरत सुतार, आप्पासाहेब सुतार, चंद्रकांत सुतार, उत्तम बोडके, सिताराम बोडके, दिलीप बोडके, दीपक बोडके, सतीश बोडके, रशीद मुलाणी, ज्ञानदेव सुतार, ग्रामपंचायत सदस्य संतोष सुतार, हनुमंत सुतार, सतीश बोडके, आदिनाथ बोडके, महेश सुतार, संजय सुतार, प्रभाकर सुतार, अर्जुन सुतार, सौरभ सुतार व महिला मंडळ व लहान मित्र मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा