Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष-- "जयदीपभाई कवाडे" यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे रुग्णांना फळे वाटप


 

संपादक---- हुसेन मुलाणी

टाइम्स - 45 -न्युज मराठी

मो.9730 867 448

                    राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार जोगेंद्र कवाडे सर यांचे चिरंजीव व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते फळे व बिस्कीट वाटप करण्यात आले



यावेळी बोलताना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी राष्ट्रीय कार्याध्यक्ष युवक हृदयसम्राट जयदिपभाई कवाडे यांनी संविधानाच्या सन्मानार्थ भीमा कोरेगाव ते दादर चैत्यभूमी असा १२ दिवस पायी चालत लॉन्गमार्च काढून युवकांमध्ये एक प्रेरणा निर्माण केल्याचे सांगून पीपल्स रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.



त्यानंतर त्यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गुडे,वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष खडतरे,वरिष्ठ क्लार्क मोरे,सुनिल खांडेकर यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे शिवाजी खडतरे,पांडुरंग चव्हाण,शिवम गायकवाड,अशोक कोळी,शहाजी खडतरे,राजू बागवान,ऋतुराज थोरात,आदेश थोरात,अर्जुन जाधव,सया शिंदे,अर्जुन कोळी,अरुण कोळी,सचिन कोळी,विनोद चौगुले, भीमराव कांबळे,ऋषिकेश गायकवाड,संदिप पवार,रोहिदास तोरणे यांचेसह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा