टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर च्या वतीने "मराठा आरक्षण "लाठीहल्ला निषेधार्थ आजच्या 'इंदापूर बंद 'ला जाहीर पाठिंबा.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक व लोकशाही मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोलनकर्त्या मराठा बांधवांना पोलिसांकडून लाठी हल्ला केल्याबद्दल सोमवार दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी "छत्रपती क्रांती सेना "-इंदापूर शहर, च्या वतीने इंदापूर बंदचे आव्हान करण्यात आले आहे त्या बंदला "टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहरच्या वतीने पत्राद्वारे जाहीर पाठिंबा दिल्याचे पत्र संस्थापक/ अध्यक्ष- 'फिरोजखान लियाकत पठाण' यांनी दिले असून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा समाजातील आंदोलकावर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर च्या वतीने जाहीर निषेध करून 'छत्रपती क्रांती सेना इंदापूर शहर 'यांनी पुकारलेल्या बंदला जाहीर पत्राद्वारे पाठिंबा देत आहोत असेही पत्रात म्हटले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा