Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३

ऊस उत्पादकांना दुसरा हप्ता देण्याची मागणी.

 "दि सासवड माळी शुगर फॅक्टरी" ने --गेटकेन ऊस उत्पादकांना दुसरा हप्ता देण्याची मागणी.


अकलूज (प्रतिनिधी)।

लक्ष्मीकांत कुरुडकर. 

मो.7020665407

                     माळशिरस तालुक्यातील दि.सासवड माळी शुगर फॕक्टरी माळीनगर ने पहिला हप्ता 2370 रु दिला आसुन अद्याप दुसरा हप्ता त्वरीत काढावा अशी मागणी गेटकेन धारक ऊस उत्पादकातून होऊ लागली आहे.कारण तालुक्यातील इतर साखर

कारखान्याने दुसरा हप्ता दिलेला आहे. शिवाय तालुक्यात समाधान कारक पाऊस नाही ही बाब काळजाचा ठोका चुकवणारी आहे. त्यामुळे कारखान्याचा ऊसाचा बागायती पट्टा उद्धवस्त होण्याची भीती आहे. निसर्गाची साथ नाही. कारखान्याच्या दरात टनामागे तीनशे ते चारशे रुपयांचा फरक पडला तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल जास्त दर देणाऱ्या कारखान्यांकडे राहील. त्यातच दुष्काळामुळे चाऱ्यालाही ऊस दिला जात आहे.

 माळीनगर कारखान्यावर सभासदाचा व गेटकेन ऊस उत्पादकांचा मोठा विश्वास आहे. येथील कारभार चांगला असल्याचे सभासद सतत बोलुन दाखवतात. पण तेवढ्यावर भागणार नाही. इतर कारखानाच्या दराशी तुलना करावी लागेल. जिल्ह्यातील कारखान्याच्या बरोबरीने दर देणार ही घोषणा आता पुरेशी नाही. आसपासच्या कारखान्याच्या बरोबरीत राहु हे शेतकऱ्यांना कृतीतून पटवून द्यावे लाग‌णार असुन सभासद व गेटकेन धारक यांना विश्वासात घेऊन बरोबरीने एकाच वेळेस बिल वाटप करावे लागणार आहे.

 जेणे करुन दि.सासवड माळी शुगार फॕक्टरी ची विश्वासार्हता अबाधित राहील.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा