🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
ज्येष्ठ पत्रकार श्रीपुर
बी.टी. शिवशरण
मो. 9527 456 958
हजारों वर्षांपासून गुलामगिरी मध्ये जिवन व्यतीत करणार्या दलित समाजाला हक्क स्वाभिमान अस्मिता जागृत करण्यासाठी समता स्वातंत्र्य बंधुता न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही आपल्या रक्ताचे थेंब आटवले संपूर्ण देश विरोधात होता त्या देशात कुत्र्याला मांजराला किंमत होती पण दलितांना नव्हती तुम्ही आमच्यासाठी अर्ध उपाशीपोटी राहुन दिवसरात्र अभ्यास केला तुम्ही परदेशात जाऊन शिक्षण घेतले माता रमाई यांनी तुम्हाला साथ दिली अनेक हाल अपेष्टा कष्ट सोसलं अनेक यातना मानअपमान सहन केला पण आज आम्हाला सर्व सुविधा योजना सवलती आहेत पण आमची मुलं दहावी बारावी च्या पुढे जातच नाहीत तुम्ही एवढे उपकार करुन ठेवले आम्हाला आई वडीलांच्या कष्टाची जाणीव नसल्याने आम्ही ऐदी बनलो तुम्ही म्हणाला होतात शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे आणि तो घेणारा गुरगुर ल्या शिवाय राहणार नाही पण आम्ही शिक्षणाचं महत्त्व जाणून आहोत पण त्याचे महत्व ओळखता येत नाही तुमच्या पश्चात समाज कुठं जायला पाहिजे होता पण आजही काही मुठभर लोक सोडले तर समाज जगण्याची धडपड करताना दिसतो याला कारण व्यसन दारिद्र्य अंधश्रद्धा जोपासणे मुलाबाळांकडे व्यवस्थीत लक्ष न देणे तुम्ही म्हणाला होता हिंदू म्हणून जन्माला आलो होतो तरी हिंदू म्हणून मरणार नाही तुम्ही जगाला शांतीचा समतेचा संदेश देणारा महाकारुणीक तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा धम्म स्वीकारला व चौदा आकटोबर एकोणीसशे छप्पन साली नागपूर येथे आम्हाला बौध्द धम्माची दीक्षा दिली परंतु आम्ही सांगायला बौद्ध आहोंत लग्न बौद्ध पध्दतीने लावतो पण आम्ही हिंदू धर्माच्या चालीरीती जपतो परंपरा पाळतो महिला नवरात्रात नऊ दिवस उपवास करतात घरांत गणपती बसवतात गौरी ची स्थापना केली जाते अजुनही खेड्यात आषाढ यात्रा केली जाते पोतराज परंपरा पुढे चालवली जाते तुम्ही म्हणाला होतात संपूर्ण भारत बौद्धमय करीन पण आमच्या अशा वागण्याने आम्ही तुम्ही दिलेल्या संदेशा प्रमाणे न. आचरण केल्याने आम्ही पुढे कसे जाणार सारा भारत बौद्धमय कसा होणार आज तुम्ही आमच्यासाठी एवढं मार्ग सुकर करुन ठेवले असतानाही आम्ही त्या मार्गावरून जात नाही हल्ली सर्व जाती आता आरक्षणासाठी जागृत झाल्या आहेत गावगाडयात महार समाज सोडून प्रत्येक जातीला बारा बलुतेदार मध्यें जगण्यासाठी व्यवसाय होता महाराला कोणताच व्यवसाय नव्हता पण तुम्ही शिक्षण हे शस्त्र आम्हाला दिले पण आम्ही त्याचा वापर उपयोग करत नसू तर पुन्हा पन्नास वर्षे आम्ही मागे जाऊ याचे जराही भान आम्हाला नाही
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा