सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभागात डाॕ.सर्वपल्ली राधाकृष्ण जयंती व शिक्षक दिन साजरा
संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक शाळा, अकलूज.प्रशालेत आज डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी .सतीश मगर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कथले वहिनी उपस्थित होत्या.तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका शेख मॅडम,प्रशालेतील सर्व समित्यांचे सदस्य,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर प्रशालेतील शिक्षिका .क्षीरसागर मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच प्रशालेतील इयत्ता ४ थी मधील विद्यार्थिनी कु.तेजस्विनी राऊत हिने आपले विचार मांडले.त्यानंतर प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान प्रशालेतील सर्व समित्यांमधील पालक वर्गाच्या हस्ते करण्यात आला.तसेच सर्व समिती मधील उपस्थित पालक वर्गाचा सन्मान प्रशालेच्या वतीने करण्यात आला.
त्यानंतर उपस्थित सन्माननीय पालक मगर ,साठे यांनी आपले विचार व्यक्त केले.त्यांनी आपल्या मनोगतातून "शिक्षकाचे" महत्त्व विशद केले.तसेच.कल्याणी भोसले,,सोनिया मेहता, भक्ती महामुनी यांनी आपले विचार मांडले व उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना "शिक्षक दिनाच्या" शुभेच्छा दिल्या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.प्रदीप मिसाळ सर यांनी केले
तर शेख मॕडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा