संपादक ---हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.--9730 867 448
. शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर ता. माळशिरस, जि. सोलापूर चा गळीत हंगाम सन 2022-23 मध्ये गाळपास आलेल्या ऊसास कारखान्याचे चेअरमन तथा विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिलेल्या शब्दानुसार उर्वरित ऊस बिलाचा अंतिम हप्ता रक्कम रू 111/- प्रति मे टन आज दि.31/10/2023 रोजी बँकेत शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळी सणासाठी वर्ग करण्यात आला आहे.
तसेच सिझन सन 2023-24 साठी गळीतास येणाऱ्या ऊसास प्रथम ऍडव्हान्स रक्कम रु 2500/- ऊस बिल 10 ते 12 व्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. तसेच ऊस तोडणी वाहतूकदार, कंत्राटदार यांना 10 ते 12 व्या दिवशी बिले अदा करण्यात येणार आहेत. तरी चालू गळीत हंगामातही कारखान्यास जास्तीत जास्त ऊस गळीतास देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे सर्व संचालक मंडळातर्फे करण्यात येत आहे.
आपला
. मिलिंद कुलकर्णी.
व्हा. चेअरमन. श्री. शंकर सह.साखर कारखाना लि. सदाशिवनगर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा