इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस.बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
: पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथे मराठा आरक्षणासाठी परिसरातील मराठा बांधवांनी काढलेल्या कँडल मार्चमध्ये अन्य समाजातील नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन मागणीला पाठिंबा दिला. मार्चमध्ये महिला व तरुणांचा लक्षणीय सहभाग होता.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पिंपरी बुद्रुक येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरात पंचक्रोशीतील गावातील मराठा समाज मोठ्या संख्येने एकत्र आला होता. या ठिकाणी पाचशेहून अधिक मराठा समाज बांधव कँडल मार्चमध्ये सहभागी झाले होते. कँडल मार्च गावाच्या प्रमुख मार्गाने काढण्यात आला.
पिंपरी बुद्रुक सह जिल्हा परिषद गटामधील सर्वच प्रमुख गावांमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सर्वच पक्षांच्या राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदीचा निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तर बंद, रास्तारोको, प्रवेश बंदीमुळे सर्वत्र एकच कोलाहल पहायला मिळाला.
फोटो - पिंपरी बुद्रुक येथील मराठा बांधवांचा आरक्षणासाठी कँडल मार्च.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा