Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०२३

राज्यात कंत्राटी पद्धतीने सरकारी नोकर भरती चा निर्णय तात्काळ रद्द करावा अन्यथा..---सचिन जगताप.

 


संपादक-- हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.9730 867 448

                        राज्यात कंत्राटी पद्धतीने सरकारी नोकर भरती, कंत्राटी शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र कंत्राटी पद्धतीने चालवायला देणे इत्यादी निर्णय तात्काळ रद्द करावे अन्यथा संभाजी ब्रिगेडशी गाठ आहे असा इशारा जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी दिला आहे






*सर्व सरकारी नोकर भरती ही कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय उद्योग, ऊर्जा आणि खानिकर्म विभागाने दिनांक ०६ सप्टेंबर २०२३ रोजी *शासन निर्णय क्रमांकः संनकणम-२०१७/प्र.क्र.९३/कामगार-०८ आपण घेतला आणि त्याची अंमलबजावणी राज्यातील वेगवेगळ्या जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत सुरू झाली आहे. तरुण मुलांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी नोकरी मिळाली पाहिजे असा शासनाचा उद्देश असताना सुद्धा आणि राज्यात वेगवेगळ्या विभागाअंतर्गत तीन लाख पदांच्या जास्त सरकारच्या सगळ्या विभागांतर्गत पदे रिक्त असताना सुद्धा कंत्राटी पद्धतीने तहसीलदार व इतर पदे भरणे हे तरुण मुला-मुलींच्या भविष्याशी व आयुष्याशी खेळण्याचा प्रकार आहे. (उदा. - जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव अंतर्गत लवाद राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत शासन निर्णय (क्र. लवाद/कावि/१४३/२०२३, दि.२७/०९/२०२३ असा आहे.) तसेच महाराष्ट्र सरकारच्या वतीने ज्या नऊ कंपन्यांची नियुक्ती केलेली आहे त्या सर्व कंपन्या भाजप आमदार व सरकार प्रेरित आहेत. यामुळे महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान होऊ शकते. सदर प्रक्रिया तात्काळ बंद करावी अन्यथा महाराष्ट्रात प्रचंड उद्रेक होऊ शकतो. म्हणून राज्यातील कंत्राटी नोकर भरतीला संभाजी ब्रिगेडचा तीव्र विरोध नोंदवत प्रांत कार्यालय कुर्डूवाडी येथे निदर्शने व घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला यानंतर संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर मॅडम यांना निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे दिनेश जगदाळे-राज्य कार्य.सदस्य, सचिन जगताप-जिल्हाध्यक्ष, संगीता गायकवाड-महिला आघाडी जिल्हाध्यक्ष,सुहास टोणपे-मा.जि.सचिव,विजयकुमार परबत-जि.संघटक,राजाभाऊ व्यवहारे,दिगंबर मिसाळ- तालुकाध्यक्ष माळशिरस,अमित घोगरे-तालुकाध्यक्ष करमाळा, भारत लटके-तालुकाध्यक्ष माढा,अविनाश पाटील- ता.कार्याध्यक्ष,सोमनाथ शिंदे-ता.कार्याध्यक्ष,शंकर नागणे- कार्यालयीन सचिव,सचिन पराडे पाटील-ता.उपाध्यक्ष माळशिरस, अजिंक्य चव्हाण- विभागप्रमुख मानेगाव,श्रीकांत गायकवाड- विभागप्रमुख कुर्डू,अभयसिंह पाटील-गटप्रमुख पिंपळनेर, किरण जाधव- ता.उपाध्यक्ष वि.आ, सागर गोडसे, डी.के.चव्हाण, किरण पाटील,महादेव नवले,शरद घोगरे,समाधान जाधव,विजय काळे-सदस्य मसेसं इत्यादी उपस्थित होते 







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा