इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
धाराशिव येथे ६५ वे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहे. त्याची निवड चाचणी निमगाव केतकी येथे शुक्रवार (दि. १३) ऑक्टोबर रोजी सकाळी ११. वाजता सावतामाळी मंदिर येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तुषार (बाबा) जाधव यांनी दिली.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे ६५ वे अधिवेशन तालीम संघ पुणे जिल्हा यांच्या मान्यतेने धाराशिव या ठिकाणी होणार आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या इंदापूर तालुका निवड चाचणी कुस्ती स्पर्धा निमगाव केतकी येथील सावतामाळी मंदिरात होणार आहे.
निवड चाचणीसाठी आमदार दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, काकासाहेब पवार, विजयकाका बराटे, अमोल बुचडे, अमोल बराटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी कुमार गटातील ४१ ते ४५ किलो ४८ किलो खालील, ५५ किलो खालील, ६० किलो खालील, ६५ किलो खालील ७१ किलो खालील, ८० किलो खालील, आणि ११० किलो खालील निवड चाचणी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वरिष्ठ गट गादी व माती गट ५७ किलो, ६१ किलो, ६५ किलो, ७० किलो, ७४ किलो, ७९ किलो, ८६ ते १२५ किलो, महाराष्ट्र केसरी निवड होणार आहे. पैलवानांनी आधार कार्ड सोबत आणण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले आहे.
यावेळी इंदापूर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष अशोक चोरमले, उपाध्यक्ष सचिन बनकर, योगेश शिंदे, संतोष पिसाळ, अस्लम मुलाणी, हनुमंत रेडके, शशिकांत सोनार, कुंडलिक कचरे, युवराज नरुटे, पोपाट शिंदे, हनुमंत पवार, सुद्दामहुसेन जमादार, गोपाळ वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड चाचणी होणार असून या स्पर्धेचे आयोजन मार्केट कमिटीचे संचालक तुषार जाधव तसेच ग्रामपंचायत सदस्य सचिन जाधव यांनी केले आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा