ज्येष्ठ- पञकार --श्रीपूर
बी.टी.शिवशरण.
टाइम्स 45 न्युज मराठी.
महाराष्ट्रातील साखर कारखान्याचे धुराडे येत्या पंधरा ते वीस दिवसांत पेटणार आहेत साखर कारखान्याने गेली सहा महिने नियोजन कारखाना मशीनरी दुरुस्ती व सर्व नियोजित कामे उरकण्याची तसेच तोडणी मजूर ऊस वहातुक वहाने यांचे करार पुर्ण करुन नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात कारखान्याचे गाळप हंगाम सुरू होणार आहेत असे असताना राज्यातील शेतकरी संघटनांचे नेते कार्यकर्ते आठ महिने शेतकऱ्यांना किती दर कारखान्याने द्यावा या बाबत शांत असतात तेव्हा ते महाराष्ट्र सरकार साखर आयुक्त साखर कारखानदार यांचे कडे जाऊन दरा संदर्भात चर्चा वाटाघाटी करत नाहीत मात्र राज्यातील साखर कारखाने सुरू व्हायला सुरुवात झाली की नेत्यांच्या अंगात यायला लागते मग ते शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा म्हणून साखर कारखाना बंद पाडतात ऊस वहातुक करणार्या वहानांचे टायर पंक्चर केले जातात पेटवले जातात शेतकर्यांचा ऊस तोडू देत नाहीत प्रसंगी वहान चालक टोळी प्रमुख यांना मारझोड केली जाते पर्यायाने हे नुकसान कारखान्याचे तर होतेच पण सर्वात जास्त नुकसान शेतकर्यांचे होत असते शेतकरी संघटनेच्या नेत्यांच्या मागण्या योग्य व रास्त असू शकतात पण हे आंदोलन चर्चा वाटाघाटी साखर कारखान्याचे गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी केल्या पाहिजेत व त्यातून निश्चित तोडगा काढला पाहिजे त्यांनी हे भान ठेवले पाहिजे ज्यांच्यासाठी आपण हे सर्व करत असताना शेतकर्यांचे नुकसान होणार नाही त्यांना त्रास होणार नाही जसे एखाद्या गावात खेड्यात जत्रा यात्रा भरते व देवाचा छबीना आरती केली जाते तेथे संबळ हलगी झांज ढोल ताशा वाजायला सुरुवात झाली की काहींच्या अंगात देवाचे वारे संचारते ते एवढे बेभान होऊन नाचू लागतात उड्या मारतात तेव्हा देव राहतो एकीकडे पालखी रहाते दुसरीकडे. आणि यात्रेचा माहोल तिसरीकडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा