संपादक-- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
मुस्लिम समाजाच्या शिक्षण, आरक्षण व संरक्षणा साठी मौलाना आझाद विचार मंचच्या वतीने "मुस्लिम हक्क परिषद" चे आयोजन शनिवार दिनांक 28 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 2 वाजता, इस्लाम जिमखाना मरीन ड्राईव्ह रेल्वे स्टेशन जवळ नेताजी सुभाषचंद्र बोस रोड ,मरीन लाइन्स मुंबई येथे आयोजित केले असून या विचार मंचावतीने प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे --19 जुलै 2014 च्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार मुस्लिम समाजाला 5% टक्के आरक्षण द्यावे --ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास संवैधानिक आरक्षण द्यावे-- केंद्र व राज्याच्या अर्थसंकल्पात मुस्लिमांसाठी यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करावी ---पंतप्रधान 15 कलमी कार्यक्रमाची कृतिशील अंमलबजावणी करावी ---मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी ,प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत 100 % शिष्यवृत्ती द्यावी ---जिल्हा निहाय मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहाची सोय करावी ---माॕब लिंचिंग ,दंगली होतील तेथे शीघ्रगतीने दोषीवर कारवाई करावी व पिढीतांना नुकसान भरपाई द्यावी---- राजकीय क्षेत्रामध्ये मुस्लिमांना योग्य प्रतिनिधित्व द्यावे-- सर्व जाती जमातीची जात निहाय जनगणना करावी --राज्यातील वक्फ संपत्तीचा उपयोग मुस्लिम समाजाच्या सामाजिक , शैक्षणिक, उन्नतीसाठी करावे-- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार झुंड ,अत्याविरोधी विशेष शिघ्रकृती पथकाची स्थापना प्रत्येक पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात करण्यात यावी ---- इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत
या कार्यक्रमाचे आयोजन मौलाना आझाद विचार मंच चे अध्यक्ष व माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री- फारूक अब्दुल्ला -विशेष अतिथी -राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंन्द्रीय कृषी मंञी शरद पवार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी चे अध्यक्ष ,नानाभाऊ पटोले तर प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद, नियोजन आयोगाच्या माजी सदस्या डॉ. सईदा हमीद ,महाराष्ट्र वक्फ बोर्ड अध्यक्ष ,आमदार डॉ वजाहत मिर्झा, माजी मंत्री आदित्य ठाकरे ,माजी खासदार भालचंद्र मुणगेकर ,माजी आमदार व इस्लाम जिमखाना अध्यक्ष युसुफ अब्राहनी, माजी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा वर्षाताई गायकवाड- माजी आय पी एस, अधिकारी अब्दुल रहमान साहब ,माजी खासदार मोहम्मद अदीब, माजी खासदार अरविंद सावंत ,आमदार व मौलाना आझाद विकास महामंडळ चे अध्यक्ष अमीन पटेल 'जमीयत उलमा महाराष्ट्र चे अध्यक्ष मौलाना नदीम सिद्दिकी ,मौलाना आझाद विचार मंचचे प्रदेश उपाध्यक्ष ,हबीब नदाफ-- सोलापूर जिल्हा अध्यक्ष इस्माईल पटेल , तसेच ऐनुल आत्तार , खलील देशमुख ,मुजमील खान, हसीब नदाफ ,शमशाद तुर्की, महमूद खान ,इस्माईल पटेल, सलीम शेख ,करीम सालार' अलीम शेख ,आसिफ खान, आयाज हसन, सोहेल सुभेदार, असद आमीन, मराठा खान, दानिश लांबे ,युसुफ खान, शबाना खान , मुज्जमिल खान, इरफान पटेल, खलील सय्यद ,जफरअन्सारी, तोफिक भाई मुलाणी , जाविद अन्सारी, जब्बार पटेल ,मौलाना अतहर, फैजुल खान ,मुराद अजरेकर, डॉ.जस्मिन खान , जावेद अहमद, असद अमीन, फिरोजा तीसेकर, शेख हसन हरीस ,इब्राहिम दलवाई,, आदी मान्यवर राज्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी मुस्लिम समाजाच्या न्याय हक्कासाठी प्रचंड संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवावा असे आवाहन मौलाना आझाद विचार मंचच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा