Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २८ ऑक्टोबर, २०२३

निमसाखर ता. इंदापूर येथे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राजकीय पुढार्‍यांना गावबंदी-- उपोषणास सर्व स्तरातून पाठिंबा.

 


इंदापूर-तालुका ,प्रतिनिधी

 एस.बी.तांबोळी. टाइम्स 45 न्युज मराठी,

मो;--9359 857 486

                                 मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्यात ठीक ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली असून त्या अनुषंगाने निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील सकल मराठा समाजाच्या वतीने दिनांक 26 ऑक्टोबर पासून निमसाखर येथे साखळी उपोषण करत राजकीय पुढार्‍यांना गावबंदी करण्यात आल्याचे निवेदन इंदापूरचे तहसीलदार यांना देण्यात आले आहे          


                या उपोषणाला निमसाखर ग्रामपंचायत च्या वतीने पाठिंबा असल्याचे पञ सकल मराठा समाजा ला देण्यात आले आहे. निमसाखर येथील तसेच दिव्यांग मुलगा गणेश पंढरीनाथ धनवडे यांनी या सकल मराठा समाजाच्या गाव बंदी साखळी उपोषणास पाठिंबा देऊन एक दिवसाचे मौन उपोषण करत या उपोषणात सहभागी होऊन पाठिंबा दिला आहे,



 त्याचप्रमाणे निमसाखर पंचक्रोशीतील सर्व जाती धर्माचे बांधव या या उपोषणात सहभागी होऊन पाठिंबा देत आहेत 

तसेच निमसाखर ग्रामपंचायत च्या वतीने सकल मराठा समाजाला दिलेल्या पाठिंब्याच्या पञाची प्रत माहितीस्तव उपविभागीय अधिकारी बारामती व पोलीस निरीक्षक इंदापूर पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा