Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २७ ऑक्टोबर, २०२३

मराठा समाजाने सैध्दांतिक बैठक असलेल्या तज्ज्ञांचा अभ्यास गट स्थापन करून आरक्षण कायद्याच्या चौकटीत कसे मिळवता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे .

 


श्रीपूर --ज्येष्ठ पञकार 

बी.टी.शिवशरण 

टाइम्स 45 न्युज मराठी.

                              मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात वातावरण ढवळून निघाले आहे कार्यकर्ते नेते आक्रमक झाले आहेत नेत्यांना पुढार्यांना गावबंदी शहरबंदी. केली जात आहे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे एकंदरीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे हा विषय प्रतिष्ठेचा अस्मितेचा झाला आहे यावर महाराष्ट्र सरकार आपली स्पष्ट व निर्णायक भूमिका जाहीर करत नाही त्यामुळे वैचारिक सामाजिक गोंधळ वाढला आहे आरक्षण मिळावे हा निष्कर्ष व तयारी एकंदरीत महाराष्ट्रातील समाजघटकांना मान्य आहे मात्र शासन गांभीर्याने घेत नसल्याने हा विषय चिघळला आहे केवळ आम्ही आरक्षण देऊ कायद्याच्या चौकटीत व न्यायालयात टिकणारे आरक्षण देऊ असं मोघम व पोकळ आश्वासन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देत आहेत  

*मराठा समाजाने आता निव्वळ उपोषण करून व नेत्यांना गावबंदी करून हा प्रश्न निकाली निघणार नाही तर समाजातील कायदेतज्ज्ञ यांची समिती स्थापन करून वस्तुनिष्ठता तपासून मराठा समाज कसा आर्थिक दृष्ट्या मागास आहे त्यांना आरक्षण का मिळाले पाहिजे हे सर्वोच्च न्यायालयात सिध्द केले पाहिजे कारण सरकारच्या हातात आरक्षण देणे राहिले नाही ते सर्वोच्च न्यायालय संविधानिक अधिकार असलेल्या बाबींचा विचार करून निर्णय देत आहे मराठा समाजाने न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी सर्व ताकद तेथे लावली जावी संघर्ष आंदोलन मोर्चा निषेध बंद कितीही पाळले दबाव आणला तरी घटनात्मक अडचणी मुळे आरक्षणाचा दरवाजा बंद आहे आता पर्यंत काही वर्षांत जेवढे मोर्चे आंदोलन महामेळावा झाले त्यावर सधन व धनदांडगे प्रस्थापित समाजाने गरजवंत मराठा समाजासाठी आर्थिक निधी जमा केला तर करोडो निधी उपलब्ध होईल तो निधी गरीब मराठ्यांच्या मुलांचे शिक्षण मुलींचे शिक्षण विवाह व निवासाची सोय यासाठी वापरला तर बराच फरक पडू शकतो आरक्षणाचा लढा सुरूच राहणार मात्र गरीब मराठ्यांच्या मदतीसाठी सधन मराठा उद्योगपती कारखानदार मंत्री आमदार खासदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे गरीब मराठ्यांच्या मदतीला धावून किती देणग्या देण्यासाठी पुढे येतात हा विषय महत्त्वाचा आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील सद्गुरू गाडगे महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी गोरगरिबांना शिक्षण देण्यासाठी जे प्रयत्न केले जी मदत मिळवून दिली त्यामुळे बहुजन समाज शिक्षणाने पुढे गेला शिक्षणाचे महत्त्व जाणून त्यांनी कित्येक पिढ्या घडवल्या या घडलेल्या पिढ्या म्हणजेच राष्ट्र उभारणी समाज सुधारणा जे धनदांडगे सधन व उच्च नेते कार्यकर्ते यांनी समाजाची सहानुभूती मिळवण्यासाठी आपल्या अलिशान गाड्या कार्यकर्त्यांचा लवाजम्यासह प्रतिष्ठा जपत मेळावा मोर्चा आंदोलनात भाग घेत आहेत पण महाराष्ट्रातील एकही गर्भश्रीमंत पुढे येऊन गरीब मराठ्यांच्या मदतीसाठी मी एवढी रक्कम देत आहे किंवा देतोय असं म्हणत नाही आमच्या शैक्षणिक संस्थांमध्ये गरीब मराठ्यांच्या मुलामुलींना मोफत प्रवेश देतो आमच्या कारखान्यात संस्थांमध्ये उद्योग क्षेत्रात नोकरी देतो असे म्हणण्यासाठी एकही मराठा उद्योगपती संस्थाचालक आपले औदार्य का दाखवत नाहीत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा