Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १९ ऑक्टोबर, २०२३

बावडा येथील शहाजीराव पाटील कृषी तंत्र विद्यालयात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम संपन्न

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी 

एस. बी. तांबोळी, 

मोबाईल -8378081147

                           -श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा संचलित महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न कै शहाजीराव पाटील कृषी तंत्र विद्यालय बावडा व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या सहयोगाने आज आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 हा कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमास श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा चे खजिनदार मा. श्री. उमेश बापू सूर्यवंशी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते सदर कार्यक्रमात मा. श्री. भाऊसाहेब रुपनवर तालुका कृषी अधिकारी इंदापूर व मा. श्री. गणेश सूर्यवंशी मंडळ कृषी अधिकारी बावडा यांनी आहारामध्ये असणारे तृणधान्याचे महत्त्व त्याचे फायदे व पौष्टिकता यांविषयी मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. विराज मोहिते सर यांनी केले तर मनोगत पर भाषण श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा चे माजी सचिव मा. श्री. सुधीर दादा पाटील सर यांनी केले. सदर कार्यक्रमास मा. श्री. कल्याण पांढरे कृषी पर्यवेक्षक मा. श्री. रामदास शिंगटे कृषी पर्यवेक्षक श्रीमती अंजली अडसूळ मॅडम कृषी सहाय्यक श्रीमती कावेरी हिरवे मॅडम कृषी सहाय्यक श्रीमती वर्षा क्षिरसागर कृषी सहाय्यक मा. श्री. अण्णा कदम कृषी सहाय्यक मा. श्री. चंद्रकांत भुजबळ कृषी सहाय्यक मा. श्री नवनाथ बोराटे कृषी सहाय्यक श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. डॉ. लहू वावरे सर व कृषी तंत्र विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते 



सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धन जी पाटील साहेब( मा.सहकार व संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य)उपाध्यक्ष मा.श्री. मनोज भाऊ पाटील निरा भिमा सहकारी साखर कारखाना शहाजी नगर संचालक मा. श्री. उदयसिंह पाटील व संस्थेचे सचिव श्री किरण काका पाटील व सर्वच संस्था पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस. टी. मुलानी सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री. एस. व्ही. कदम सर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा