Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २९ ऑक्टोबर, २०२३

मराठा समाजाच्या मागणीचा सरकार गांभीर्याने विचार करत नसेल तर असे निष्क्रिय सरकार बरखास्त झालेले बरे!

 


श्रीपूर -ज्येष्ठ पञकार

बी.टी.शिवशरण 

टाइम्स 45 न्युज मराठी

                               महाराष्ट्रातील सकल मराठा समाज एकवटला असताना व त्यांनी एकमुखाने त्यांची गरजवंत मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी रास्त आहे पण सरकार निष्क्रिय आहे जर समाजाच्या मागण्या हक्क आपल्याला देता येत नसेल तर असले निष्क्रिय सरकार बरखास्त झालेले बरे ‌ छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचा विचार करून सर्वांना समान न्याय समान काम समान अधिकार देण्याची भूमिका घेतली होती रयतेचा विचार हाच स्वराज्याचा विचार ही त्यांची शिकवण होती जर सरकार एवढ्या लोकभावना विचारांत घेत नसेल तर हे सरकार नेमकं कुणासाठी काम करते हा जाब विचारण्याची वेळ आली आहे समाजाला प्राधान्य दिले पाहिजे लोकप्रतिनिधी हे सत्तेत कुणामुळे बसलेत हे त्यांनी लक्षात घेऊन सारासार विचार केला पाहिजे जरांगे पाटील हा निस्वार्थी नेता समाजासाठी प्राण पणाला लावून लढत आहेत त्यात राजकारण नाही स्वार्थ नाही त्यांची तळमळ समाजासाठी आहे मराठा समाजाचे मोठे आंदोलन आहे संपूर्ण समाज एकवटला आहे जर समाज अद्याप शांत आहे जर त्यांनी रस्त्यावर येऊन मंत्री आमदार खासदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना वेगळ्या पद्धतीने जाब विचारला तर त्यांना पळता भुई थोडी होईल हे लक्षात घेतलं पाहिजे मनोज जरांगे पाटील यांच्या सहनशीलतेचा अंत सरकारने पाहू नये त्यांचे उपोषण स्थळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जाऊन त्यांची मनधरणी करुन उपोषण सोडण्याची विनंती केली पाहिजे सरकार जर एवढ्या मोठ्या आंदोलनाची दखल घेऊन आरक्षण देत नसेल तर या सरकारचा उपयोग काय तुम्हाला आरक्षण देण्याचा अधिकार नसेल तुम्ही देत नसाल तर सरकार बरखास्त करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा