संपादक ---हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो. 9730 867 448
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील पत्रकार सोमवार ,दि. 30 ऑक्टोंबर 2023 रोजी उपोषण आंदोलन करणार आहेत.धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांचे आंदोलन होणार आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यभर तीव्र आंदोलन सुरू आहे. मराठा आरक्षण योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला पत्रकार या संवेदनशील प्रश्नांमध्ये मराठा समाजाच्या सोबत लेखणीच्या माध्यमातून खंबीरपणे उभा आहे. दुर्दैवाने सरकार या अतिशय महत्त्वपूर्ण संवेदनशील विषयाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तमाम पत्रकार बंधू- भगिनींच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी उपोषण आंदोलन करणार आहेत. शासनाने तातडीने दखल घेऊन मराठा समाजास आरक्षण लागू न केल्यास आगामी कालावधीत शासकीय कार्यक्रम, बातम्या व वृत्त संकलनावर बहिष्कार घालण्यासह तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. उपोषण आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन राज्यपाल श्री रमेश बैस व मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिले जाणार आहे. या आंदोलनात पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री धनंजय रणदिवे ,श्री चंद्रसेन देशमुख, सरचिटणीस श्री संतोष जाधव , श्री रवींद्र केसकर, बालाजी निरफळ, ज्ञानेश्वर पतंगे, सयाजी शेळके, संतोष हंबीरे , राजाभाऊ वैद्य, मच्छिंद्र कदम, श्रीकांत कदम, बालाजी वडजे, अंबादास पोफळे, अब्बास सय्यद, प्रमोद कांबळे, सुरेश घाडगे, गौतम चेडे ,मुकुंद चेडे, इक्बाल मुल्ला, पार्श्वनाथ बाळापुरे, विलास मुळीक, सचिन ताकमोगे, अशोक दुबे, अरविंद शिंदे, सुभाष कदम ,निशिकांत क्षिरसागर, सुधीर पवार , अविनाश गायकवाड, प्रवीण पवार ,संतोष शेटे, उमाजी गायकवाड, श्रीनिवास भोसले , निजाम शेख , अजित माळी आदींनी केले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा