माणसातील देवमाणूस
प्रेरणेचा निर्मळ झरा तो
सतत खळखळनारा.
माणसातील देवमाणूस हा
दुःखीतांचे अश्रू पुसणारा.
देऊन थाप शाबासकीची
मुलांच्या पंखात बळ देणारा.
नाते मनुसकीचे दीन दुबळ्यांशी आपुलकीने जोडणारा.
सत्तरीपार तरुण हा विकासाचा ध्यास घेऊन सतत चालणारा.
कला क्रीडा असो वा सण उत्सव
अष्टपैलू नेतृत्वाने सर्वांची मने जिंकणारा
लोकनेता आमुचा लाडका सर्वांना सोबत घेऊन चालणारा .
नूरजहाँ शेख
गणेशगाव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा