इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे यांच्या इंदापूर येथील ऐतिहासिक गढीचा बुरूज रविवारी (ता. १) रात्री झालेल्या पावसाने ढासळला. त्यामुळे गढीच्या संवर्धनचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
इंदापूर येथे रविवारी दुपारी व संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे रात्री या गढीचा प्रवेशद्वारावरील डाव्या बाजूचा बुरूज ढासळला. त्यामुळे आगामी काळात अजून पडझड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. किमान आता तरी या गढीच्या संवर्धनाचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याची मागणी माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, नागरी संघर्ष समितीचे प्रमुख व माजी उपनगराध्यक्ष प्रा. कृष्णा ताटे, गटनेते कैलास कदम, महादेव सोमवंशी, हमीद आतार, महादेव चव्हाण, प्रदीप पवार, अशोक ननवरे यांच्यासह अन्य शिवभक्तांनी केली आहे. या गढीच्या संवर्धनासाठी शासन स्तरावर विकास कृती आराखडा तयार करून लवकरच या गढीच्या पुनर्वसन आणि पुनर्जीवीकरणासाठी शासनाकडे पाठपुरावा झालेला आहे.
माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रेय भरणे यांनी अधिवेशनात लक्षवेधी मध्ये हा प्रश्न तारांकित करत सभागृहाचे लक्ष वेधले होते. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्य सचिव व वरिष्ठअधिकारी यांच्यासमवेत बैठक घेत निधीबाबत आश्वासित केले होते. तर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक पर्यटन विकासमंत्री यांना भेटून याबाबत पाठपुरावा केला. एवढे असताना या गढीच्या कामाला प्रत्यक्ष केव्हा मुहूर्त लागणार? असा प्रश्न शिवप्रेमीमधून उपस्थित केला जात आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा