इंदापूर तालुका...... प्रतिनिधी
एस. बी. तांबोळी,
मोबाईल-8378081147
- गणेशवाडी येथे डोळे, मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये बारा जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी निवड करण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्र बावडा व उपकेंद्र पिंपरी बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमानाने गणेशवाडी येथील अंगणवाडी केंद्रात डोळे तपासणी शिबिर घेण्यात आले. एस. व्ही. देसाई महंमदवाडी (पुणे) यांच्यावतीने तुकाराम पाटील, रमेश केंगार यांनी तपासणी केली. यावेळी डॉ सुमित्रा कोकाटे, आशासेविका रफिया तांबोळी, पोलीस पाटील किरण खंडागळे, अंगणवाडी मदतनीस बशीरा तांबोळी, प्रदिप बोडरे, अश्विनी साठे आदि मान्यवर उपस्थित होते.
सदरील शिबीरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी निवड करण्यात आलेल्या रूग्णांना बसने एस.व्ही. देसाई महंमदवाडी (पुणे) येथे शस्त्रक्रिया करून परत आणून सोडण्यात येणार आहे.
फोटो - गणेशवाडी येथे डोळे, मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा