संपादक-- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
शिवसेना व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नवराञ महोत्सवा निमित्त तुळजापूर येथे घेतले श्री आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले
दर्शनानंतर पञकारांशी बोलताना दानवे म्हणाले कि शिवसेने ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) शी गद्दारी करणाऱ्या खोके बहाद्दुर मनुष्यरुपी राक्षसांचा महिषासुर मर्दिनी नक्कीच वध करेल.आणि गद्दारांना महाराष्ट्रातील जनताच धडा शिकवेल . यावेळी दानवे यांनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन पुन्हा एकदा महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार येऊ दे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ देत आसे साकडे आई जगदंबेच्या चरणी घातल्याचे त्यांनी सांगितले
या प्रसंगी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) च्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामल ताई वडणे, सोलापूर शिवसेना महिला जिल्हाप्रमुख तथा उपनेत्या अस्मिताताई गायकवाड, तसेच पंढरपूर महिला आघाडी जिल्हाप्रमुख पूनमताई अभगराव तसेच लातूर शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भाऊ सोमवंशी ,धाराशिव शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील ,युवासेना सचिव अक्षय ढोबळे, मा.शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाम पवार, युवासेना तालुका प्रमुख प्रतीक रोचकरी, शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, शिवसेना उपतालुकाप्रमुख सुनील जाधव ,शिवसेना उपशहरप्रमुख बाळासाहेब शिंदे , युवा सेना शहरप्रमुख सागर इंगळे, विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख विकास भोसले ,आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा