- आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्याकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुणे जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवार (दि २५) रोजी मोर्चा व जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे. तर (दि.२१) रोजी जिल्ह्यातील सर्व आमदारांना निवेदन देण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक यांनी (दि १८ऑक्टोबर) पासून बेमुदत संप पुकारला आहे. तसेच शासन व प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले आहे. त्यामध्ये आशा गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन द्या, गट प्रवर्तक यांना स्वतंत्र प्रवास भत्ता द्या, ऑनलाईन कामाची सक्ती बंद करा, दिवाळी बोनस पाच हजार रुपये द्या, मोबाईल व मोबाईल रिचार्ज साधने उपलब्ध करून द्या, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, रस्ते अपघात विमा द्या, गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना बाळंतपणाची रजा द्यावी आदि मागण्यांचे निवेदन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे आमदार यांना (दि २१) देण्यात येणार आहे.
तसेच (दि २५ऑक्टोबर) रोजी मागण्याकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुणे जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा व जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामीण व शहरातील आशा व गटप्रवर्तक भगिनींनी सकाळी ११ वाजता पुणे जिल्हा परिषद कार्यालयात एकत्रित जमण्याचे आवाहन कॉम्रेड विठ्ठल करंजे व कॉम्रेड निलेश दातखिळे यांनी केले आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा