Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ७ ऑक्टोबर, २०२३

महाराष्ट्र विकास सेनेची पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात बैठक-- मनसे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केला प्रवेश-- अकलूज येथे १० ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन.

 


विशेष---- प्रतिनिधी

कासिम (राजु)मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.84088 17333

                      महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या उपस्थितीमध्ये पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमधील मंगळवेढा आणि पंढरपूर येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी महाराष्ट्र विकास सेनेचे अजित साठे,राजेश खरे, लखन शिंदे,सागर तपासे,महेंद्र साठे,दत्ता नाईकनवरे तसेच मंगळवेढा तालुक्यातील किशोर शेबडे,सागर खरबडे,साजन शेबडे, प्रवीण अवघडे,किशोर रणदिवे, महेबूब शेख,मायप्पा प्रक्षाळे,राहुल कांबळे,सागर म्हस्के,अंबादास कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.




पक्षप्रमुख किरण साठे यांच्या उपस्थितीमध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे विद्यार्थी संघटनेचे माजी जिल्हा संघटक सागर बडवे संभाजी ब्रिगेडचे अर्जुन शेटे,हनुमंत भुसणर,संजय बिनवडे यांनी महाराष्ट्र विकास सेना पक्षात प्रवेश केला.



महाराष्ट्र विकास सेना पक्ष 11 सप्टेंबर रोजी स्थापन करण्यात आला असून महाराष्ट्र विकास सेनेच्या माध्यमातून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये गाव भेट दौरा आयोजित करून पक्ष विस्तार करण्याचे काम किरण साठेंनी हातामध्ये घेतले असून येत्या 10 ऑक्टोबर रोजी अकलूज येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाचा पहिलाच राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्याच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पक्षप्रमुख किरण साठे दौरा करत असल्याचे दिसून येत आहे.सदर बैठकी प्रसंगी पक्षप्रमुख किरण साठे यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा