विशेष---- प्रतिनिधी
कासिम (राजु)मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.84088 17333
इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती जळकोट ता. तुळजापूर येथे भक्तिभावाने साजरी करण्यात आली दिनांक 28 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी (गणेश विसर्जन) व (ईद-ए-मिलाद) पैगंबर जयंती एकाच दिवशी आल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून मुस्लिम समाजाने पैगंबर जयंती अनंत चतुर्दशीनंतर साजरी करण्याचा निर्णय घेतला त्या अनुषंगाने दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी जळकोट येथे (ईद-ए-मिलाद )पैगंबर जयंती साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त नातखानी व बयान प्रवचन चा कार्यक्रम घेण्यात आला ज्यामध्ये जळकोट आणि परिसरातील 65 मुला मुलींनी सहभाग नोंदवून प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर नातखानी व प्रवचन सादर केले. हा कार्यक्रम मौलाना एजाज साहब ,मौलाना गुलाम नबी साहब , मौलाना अबोबकर साहब, यांच्या उपस्थितीत संपन्न झाला तसेच या जयंतीनिमित्त सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी हाजी बाबूलाल बागवान ,हुसेन बागवान ,शकील मुलाणी, अश्फाक शेख ,फारूक शेख ,अमजद बागवान ,ताजुद्दीन बागवान, मेहबूब तांबोळी ,मुस्तफा जामदार, रियाज जमादार व समाजातील बहुसंख्य युवकांनी परिश्रम घेतले शेवटी सलातो सलाम ने कार्यक्रमाची सांगता झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा