तुळजापूर ,तालुका - प्रतिनिधी
चाँदसाहेब शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
मो;--9850 432 633
सोलापूर -तुळजापूर -धाराशिव रेल्वेमार्गासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील काही गावचे भुसंपादन निवाडा 15 दिवसापूर्वी घोषित होऊनही अद्यापपर्यंत बाधित शेतकरी यांना उत्तर सोलापूर भुसंपादन अधिकारी यांच्याकडून नोटीस का दिल्या गेल्या नाहीत याबाबत बाधित शेतकरी वर्गातून उलटसुलट चर्चांना उधाण आले (विलंबाचे कारण काय ) याबाबत जिल्हाधिकारी व भूसंपादन अधिकारी यांनी खुलासा करावा अशी मागणी बाधित शेतकरी वर्गातून जोरदारपणे केली जात आहे
रेल्वे सुधारणा अधिनियम 2008 च्या 20 फ नुसार नुकसानभरपाई निवाडा गेल्या 16 ऑक्टोबर रोजी घोषित झाला असून अद्याप भुसंपादीत शेतकरी यांना नोटीस पाठवल्या गेल्या नाहीत. यामध्ये विलंबची कारणे काय आहेत का जाणूनबुजून अधिकारी चालढकल करत आहेत याचा खुलासा करावा अशी मागणी जोरदारपणे केली जात आहे
निवाडा घोषित झाल्यापासून 48 तासात नोटीस देणे आवश्यक असताना 15 दिवस होऊनही अद्याप शेतकरी यांना भूसंपादन मोबदला देणेबाबत प्रलंबित ठेवायचा हेतू काय? जाणूनबुजून अधिकारी चालढकल करत असल्याचा आरोप बाधित शेतकरी वर्गातून केला जात आहे
केंद्र व राज्य सरकार जलदगतीने महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र तुळजापूर रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी कटिबद्ध असताना अधिकारी एवढे सुस्त कसे? असा विषयही चर्चिला जात आहे
-------------------------------------------
उत्तर सोलापूर तालुक्यातील बाधित गावे पुढील प्रमाणे
"देगाव , भोगाव , बाळे , होनसळ , बानेगाव , मार्डी , खेड , कसबे सोलापूर , सेवालाल नगर"
---------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा