अकलुज ---प्रतिनिधी
बाळासाहेब गायकवाड
टाइम्स 45 न्युज मराठी
दिनांक :29 ऑक्टोबर 2023 रोजी पुणे कोरेगाव पार्क येथे सिद्धी फाऊंडेशन तर्फे स्टार डायमंड मिस , मिसेस , मिस्टर आणि किड्स च्या आशिया इंटरनॅशनल award 2023 च्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धमधे मिसेसाठी एकूण 20 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
त्या मधे अकलूज येथील डॉ अर्चना गवळी यांना मिसेस आशिया इंटरनॅशनल गोल्ड विनर 2023 चा किताब मिळवला.
अर्चना गवळी या 15 वर्षे झाले गवळी हॉस्पिटल मॅटरनिटी सर्जिकल अँड लॅप्रोस्कोपी सेंटर अकलूज येथे रुग्णांची सेवा करीत आहे. यासोबतही ते सामाजिक , कला , क्रीडा क्षेत्रातही अग्रेसर आहे.
निमा वुमेन्स फोरम च्या त्या उपाअध्यक्ष आहे. इनरव्हील क्लब च्या सेक्रेटरी होत्या
रोटरी क्लब मधे पण त्या सदस्य होत्या.
या अंतर्गत त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहे रक्तदान शिबिर,वृक्षारोपण, महिलांचे विविध तपासण्या, विविध ठिकाणी health मार्गदर्शन शिबिर ही त्यांनी केले आहे
अर्चना गवळी या मिसेस इंडिया अर्थ 2023,
टायटल ब्युटी विथ कँप्याशन मेडीक्वीन मिसेस महाराष्ट्र वन ऑफ द रेपुटेशन पेजेंट आहे.तसेच त्यांनी खूप ठिकाणी ज्युरी म्हणून काम पाहिले आहे, तसेच त्या कॅरम आणि चेस मधे चॅम्पियन आहे. अकलूज च्या डॉ टीम च्या त्या कॅप्टन आहे त्या डॉ च्या क्रिकेट तर्फे राज्यस्तरीय क्रिकेट मधे पण सहभागी होत्या.
अशा या डॉ अर्चना गवळी सर्व क्षेत्रात अग्रेसर असून त्यांनी मिसेस आशिया इंटरनॅशनल गोल्ड विनर 2023हा किताब मिळवला असून त्यांच्यावरती विविध क्षेत्रातून मान्यवरांचा फोन द्वारे, प्रत्यक्षात भेटून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा