Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३

नळदुर्ग ता. तुळजापूर पोलीस स्टेशन अंतर्गत 302 कलमा खालील फरार आरोपी "नवनाथ आप्पाराव पाटील "बाबत नळदुर्ग पोलिसांचे आवाहन.

 


टाइम्स 45 न्युज मराठी

                            पोलीस स्टेशन नळदुर्ग ता. तुळजापुर जि. धाराशिव (उस्मानाबाद) येथे दिनांक 13/11/2023 रोजी 'भा.दं.वि. कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयातील आरोपी नामे नवनाथ आप्पाराव पाटील रा. सराटी ता. तुळजापुर याने त्याचा भाऊ चुलत नरसाप्पा पाटील यास पाठीमागुन कोयत्याने डोक्यात व समोरुन तोंडावर वार करुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले आहे. सदर गुन्हयातील आरोपी नामे नवनाथ आप्पाराव पाटील रा. सराटी हा गुन्हा घडलेपासुन फरार आहे. सदर आरोपी हा आपणास दिसल्यास त्याबाबत आम्हाला खालील मोबाईल क्रमांकावर तात्काळ संपर्क करावा. सदर आरोपीची माहीती दिल्यास आपणास योग्य ते बक्षीस देण्यात येईल. आपण दिलेल्या माहीतीबाबत गोपनीयता बाळगण्यात येईल, आरोपी नामे नवनाथ आप्पाराव पाटील याचा फोटो खाली जोडण्यात आला आहे.




संपर्क:-

प्रभारी अधिकारी सपोनि एस. एस. लोखंडे मो.नं. 9421740511 सपोनि- पी. आर. तायवाडे, मो.नं. 8999674641

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा