इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- स्वतंत्र भारताच्या इतिहासातील विशेष दिवस म्हणून देशभरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताने संविधान स्वीकारले भारताचे संविधान तयार करण्यासाठी एकूण २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस लागले. संविधान लिहिण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा असल्याने आज संविधान दिन देशात साजरा केला जातो.
संविधान दिनाचे औचित्य साधून पिंपरी बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रस्तावनेची प्रतीची पुजा करण्यात आली. संविधान प्रस्तावनेचे वाचन विस्तार अधिकारी युन्नूस शेख, श्रीकांत बोडके, उपसरपंच संतोष सुतार, पांडुरंग बोडके, अशोक बोडके, सुदर्शन बोडके, रमेश मगर, राजेंद्र मगर, आण्णा पाटील, ग्रामसेवक गणेश लंबाते आदिंनी केले.
संविधान दिनाचे औचित्य साधून बावडा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील आंबेडकरांच्या अर्धपुतळ्यास नुतन सरपंच पल्लवी गिरमे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विधीवत पुजा पाठ, धम्मवंदना, संघवंदना, त्रिशरण पंचशील गाथेचे पठन बौध्दाचार्य गौतम जगताप यांनी केले. यावेळी अखिल कांबळे यांनी संविधान प्रस्तावनेचे वाचन केले. कार्यक्रमा दरम्यान सुप्रिया कांबळे, शामराव कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल कांबळे, संतोष सुर्यवंशी ग्रामपंचायत सदस्य यांनी भारतीय संविधान" या विषयावर आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी आंबेडकर जयंती मंडळाचे अध्यक्ष हनुमंत भोसले, खजिनदार आर्या कांबळे, गौतम जगताप, अखिल कांबळे, समाधान कांबळे, काका कांबळे, नवबौद्ध समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बावडा ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पल्लवी गिरमे, उपसरपंच रणजित घोगरे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिकपणे संविधान प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले. यावेळी पंडितराव पाटील, अनिल कांबळे, पल्लवी गिरमे, रणजित घोगरे यांनी संविधान दिनाचे औचित्य साधून आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमादरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर मिशनच्या पदाधिकाऱ्यांनी संविधान प्रस्तावनेची प्रत नुतन सरपंच पल्लवी गिरमे, ग्रामसेविका आंबिका पावसे यांना भेट म्हणून दिली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष सुर्यवंशी, विठ्ठल घोगरे, तानाजी गायकवाड, संतोष गायकवाड, अश्विनी कांबळे, सुप्रिया कांबळे, आनंदाबाई कांबळे, महादेवराव घाडगे, विक्रमसिंह घोगरे, मंगल माने, अमृता शिंदे, सामाजिक कार्यकर्ते पंडितराव पाटील, विशाल कांबळे, सुयश कांबळे, यासह आशासेविका, अंगणवाडी सेविका, गावातील ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होता. तसेच २६/११ च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना व बावडा गावातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉ प्रशांत शिंदे यांचे ४४ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाल्याने त्यांना ग्रामस्थांच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली.
नरसिंहपूरसह परिसरातील पिंपरी बुद्रुक, गिरवी, गोंदी, लुमेवाडी, सराटी, निर निमगांव, लाखेवाडी, खोरोची, रेडणी, रेडा, शहाजीनगर, सुरवड, भांडगाव, यासह अन्य गावातील विविध शासकीय कार्यलया मध्ये संविधान दिन साजरा करून, २६/११ हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा