Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३

निमसाखर ता.इंदापूर येथील निमसाखर एज्युकेशन सोसायटी संचलित यांनी एन.ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात "संविधान दिन" साजरा.

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

                        निमसाखर ता. इंदापूर जि.पुणे येथील निमसाखर एज्युकेशन सोसायटी संचलित, एन. ई. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आज सविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक मधुकर खरात सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख चंद्रकांत बोंद्रे सर यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले या संविधान दिना निमित्त विद्यालयाचे पर्यवेक्षक मधुकर खरात सर, विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक प्रमोद चव्हाण सर, अनुराधा रणवरे मॅडम यांनी संविधान दिना विषयी मार्गदर्शन केले . त्यावेळी विद्यालयातील मुलींनी संविधानाचे वाचन केले. तसेच मुंबई च्या 26/ 11 च्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. प्राचार्य, चंद्रकांत रणवरे सर, पर्यवेक्षक मधुकर खरात सर, कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख चंद्रकांत बेंद्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सांस्कृतिक विभागाने उत्तम प्रकारे पार पाडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा