संपादक---- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.--9730 867 448
माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी सह अनेक गावामध्ये भारत सरकार व्यवहार विभाग व नाफेड यांच्या माध्यमातून शिवरत्न फाउंडेशन डॉटर मॉम फाउंडेशन ,भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका व बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व लोकप्रिय आमदार आरोग्य दूत राम सातपुते तसेच धैर्यशील मोहिते पाटील संघटक सरचिटणीस सोलापूर जिल्हा यांच्या मार्गदर्शनाने दिवाळीनिमित्त एका आधार कार्डवर ५ किलो ६० रुपये किलो दराप्रमाणे सवलतीच्या दरात हरभरा डाळ उपलब्ध करून देण्यात आली आहे .माळशिरस तालुक्यातील माळशिरस वेळापूर खंडाळी अकलूज गोरडवाडी पिलीव इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिवाळी सणानिमित्त भारत डाळ योजनेअंतर्गत भव्य प्रमाणात डाळ वाटप करण्यात आली .
धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमित पुंज सहसंयोजक सांस्कृतिक सेल माळशिरस तालुका , बापूसाहेब शिरसागर वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख शिवसेना माळशिरस तालुका , तेजस बोबडे मोहोळचे प्रसिद्ध उद्योगपती , स्वप्निल शहाणे अकलूज शक्ति केंद्रप्रमुख , गणेश भिंगे तसेच मच्छिंद्र कर्णवर पाटील शक्ती केंद्र प्रमुख भारतीय जनता पार्टी व विकास सोसायटी संचालक गोरडवाडी यानी सहकार्य केले .
शासन आपल्या दारी योजना आणून सर्वसामान्यांना एक वेगळा पायंडा पाडला त्याच धर्तीवर दसरा दिवाळीच्या मुहूर्तावर बऱ्याच गावात हरभरा डाळ वाटप करण्यात आली आहे तळागाळातील लोकांपर्यंत हरभरा डाळ पोचली पाहीजे . ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा