संपादक---- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.--9730 867 448
स्वातंत्र्या च्या अमृत महोत्सवात शेतकरी बंधूना खात्रीशीर उत्पन्न देणाऱ्या शेती पुरक उदयोग तुती लागवड वर रेशीम उदयोगास महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत अनुदानास ६ सब्टेबर २०२३च्या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे. सन २०२२ -२३ मध्ये रेशीम कोषास २५० ते ९०० रुपये भाव मिळाला आहे. दर्जात्मक उत्पादनास खुप मोठी संधी व वाव आहे. याच्या जोडीला मनरेगा मधून भरीव अनुदान कुशल व अकुशल बाबीस उपलब्ध आहे. तुती लागवड करून रेशीम उदयोग वा दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेळी, मेढी , दुभती जनावरे २५% पेक्षा जास्त प्रथीने असलेला हिरा पानाचा चारा म्हणून दुहेरी उपयोग करता येईल . यासाठी ३० नोव्हेबर पर्यत ग्रामपंचायत , कृषि विभाग व रेशीम नजीकचे कार्यालयाकडे कमीत कमी १एकर ला ५०० रु सभासद फी भरून जास्तीत ५ एकरपर्यत जॉबकार्ड धारक व पाणी उपलब्ध असणाऱ्या लाभार्थीनी अर्ज करावयाचे आहेत. त्यासाठी सोबत लिक देण्यात येत आहे. . रेशीम उदयोग शाश्वत उत्पन्न देणारा , एकदा लागवड केली की १२ -१५ वर्षे लागवड खर्च नसणारा , एकदा संगोपन गृह व सहित्य खरेदी नंतर पुन्हा पुन्हा खर्च खर्च नसणारा , कमी पाण्यात, किटकनाशके बुरशीनाशके यांचा खर्च नसणारा एकमेव उदयोग आहे. एकरी व्ही -१ या सुधारित वाणाची ६००० रोपे ५x३ x २ वर लागवड करून या साठी १ एकरी साठी तृतीलागवड , साहित्य, शेड, ठिबक सिंचन, निर्जतुकीकरण साठी सर्वसाधारण ला ३.७५ लाख व एससी साठी ४.५० लाख अनुदान ३वर्षात मनरेगामधून उपलब्ध आहे . यासाठी रेशीम संचनालय नर्सरी साठी व्ही-१ तृती वाण , अंडीपुज , तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध आहे. तसेच उत्पादीत कोष हमी भवाने खरेदी केले जाणार आहे. म्हणजेच अनुदान फॉरवर्ड लिक बॅकवर्ड लिंक मुल्य साखळी मध्ये शासन सहकार्य करणार आहे . तरी शेतकरी बांधवांनी आधिक माहिती मार्गदर्शन साठी नजीकचे कृषि विभाग कार्यालय , कृषि सहायक ,ग्रामसेवक , रेशीम अधिकारी व कृषि विभाग संकेत स्थळाला भेट देण्याचे आवाहन, मंडळ कृषि अधिकारी नातेपुते कार्यालयाने केले आहे . खालील लिक वर अर्ज करावेत.https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdL4PBgOvNTX-vUhc5M1Ocrht2V1v_thkDl3koXL6qeR3ROeA/viewform
सतिश कचरे,मंडळ कृषी अधिकारी ,नातेपुते.(ISO9001:2015)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा