Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ७ मार्च, २०२६

*अकलूज येथील पेशवेकालीन गणपती मंदिराचा सभा मंडपाचा जीर्णोद्धार कामास शुभारंभ.* *अकलूजच्या वैभवात घालणारे गणपती मंदिर.*

 *अकलूज ---प्रतिनिधी* 

    *केदार --लोहकरे*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी*


अकलूज येथील २६५ वर्षांपूर्वीच्या पेशवेकालीन गणपती मंदिराचा सभा मंडपाचा जीर्णोद्धार कामास प्रारंभ झाला आहे.पुरातन काळातील गणपती मंदिर याचा जीर्णोद्धार ब्राह्मण सेवा संघ व गणपती मंदिर ट्रस्ट अकलूज यांनी हाती घेतले आहे 


           या मंदिराचा इतिहास सांगायचे झाल्यास सदर मंदिर थोरल्या माधवराव पेशवे यांच्या शुभहस्ते चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १८१७ म्हणजेच ६ एप्रिल १७६१ रोजी प्रतिष्ठापना करण्यात आली होती.हे अकलूजमधील पुरातन मंदिर असून या श्री गणेशाची मूर्ती ही उजव्या सोंडेची आहे.सन १९८२ साली अकलूजमधील प्रमोद दिनकर उर्फ अण्णा कुलकर्णी यांनी समविचारी लोकांना एकत्र करून ब्राह्मण समाजाची मोट बांधण्याचे ठरवले व ब्राह्मण सेवा संघ स्थापन झाली व १९८३ पासून आजतागायत या संघामार्फत सामुदायिक व्रतबंध समारंभ साजरे केले जातात तसेच पाच वर्षे वधू-वर मेळाव्यांचे आयोजन केले जाते सदरचे मंदिर पूर्वी फार जुने होते वर माळवदाचे छत होते.पूर्वीचे लोक विविध कार्यक्रमाच्या वेळी शेणाने सारवून व स्वच्छता करून विधी करायचे हे लक्षात घेऊन ब्राह्मण सेवा संघाने गणपती मंदिर आपल्याशी जोडून घ्यावयाचे ठरवले सदर मंदिराच्या सभामंडपाचे जीर्णोद्धाराचे काम समाजातील कै.सुरेश भास्कर उर्फ चंदू आंबेकर यांच्या पुढाकाराने माळशिरसचे तालुक्याचे माजी आमदार कै.चांगोजीराव आबासो उर्फ बाबुरावजी देशमुख यांचे पुढाकाराने  सर्व समाजातील लोकांच्या मदतीने पूर्ण केले.त्यास सर्वच लोकांनी भरपूर सहकार्य केले.त्यामुळे माळवदी छत जाऊन सध्याचे स्लॅबचे छत आले.दानशूर व्यक्तींनी भरपूर प्रमाणात मदत केली केले.अकलूज येथील कपड्याचे व्यापारी प्रभाकर गणेश लोहकरे यांनी सन २०/१०/१९८७ रोजी त्यांच्या पत्नी कै.सौ. आनंदीबाई लोहकरे यांचे स्मरणार्थ फरशीचे काम केले तसेच अकलूजचे प्रसिद्ध ॲडव्होकेट गजानन नामदेव रेळेकर यांनी त्यांच्या आई कै.मथुराबाई नामदेव रेळेकर यांचे स्मरणार्थ मंदिराच्या गाभाऱ्यातील स्टाईलचे काम केले. सर्वांच्या मदतीने सदरचे काम पूर्णत्वास आले.त्यानंतर ब्राह्मण सेवा संघ,अकलूज यांनी गणपती मंदिर ट्रस्टमध्ये आपले नोंदणी केली.सन १९९० पासून Krwa ट्रस्टचे नाव ब्राह्मण सेवा संघ व श्री गणपती मंदिर ट्रस्ट असे झाले.मंदिराचे नियोजन ब्राह्मण सेवा संघाकडून केले जात आहे.ब-याच वर्षापासून मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा अशी सर्व समाजाची इच्छा होती ती आज मूर्त रूपात आली

          आता सदर मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आलेले आहे दिनांक ५ मार्च रोजी सदर मंदिराचे जुने बांधकाम पाडकामास सुरुवात झाली असून लवकरच नवीन स्वरूपात सभा मंडप उभारत आहे सदर प्रसंगी समाजातील सर्व घटकांनी तन-मन- धनाने सहकार्य करावे.असे आवाहन ब्राह्मण सेवा संघ व श्री गणपती मंदिर ट्रस्ट अकलूज यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.


*चौकट*

ब्राह्मण सेवा संघ व श्री गणपती मंदिर ट्रस्ट अकलूज यांच्या वतीने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमास मोहिते-पाटील परिवार,माने-पाटील परिवार, देशमुख परिवार व ॲड.माधवकाका मिरासदार पंढरपूरचे परिचारक परिवार यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभते.तसेच पंढरपूरचे माजी आमदार कै.सुधाकरपंत परिचारक परिवार तसेच माळशिरसचे कै.विष्णुपंत कुलकवर्णी उर्फ अण्णाकाका व यांचे वेळोवेळी विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा