*संपादक---- हुसेन मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448
*दि 14-11-2023 वार मंगळवार रोजी मंगरूळ ता तुळजापूर येथील शिंदे कुटुंबातील सदस्य व त्यांचे पाहुणे हे मुलगी पहायला व लग्न जमवायला* *आरळी ( खुर्द) येथे पारवे परिवार यांच्या घरी आले. मंगरूळ येथील इंदिरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक* *सुदर्शन शिंदे हे त्यांचे चिरंजीव श्रीशैल शिंदे याला मुलगी पाहण्यासाठी आरळी खुर्द येथील अभिमन्यू पारवे यांची मुलगी * *कु.वैष्णवी हिला पाहण्यासाठी दिपावलीच्या पाडव्याचा मुहूर्त साधून आले. मुलगी पहिली पसंत ही झाली . लगेच बैठक ही झाली.*
*याप्रसंगी धाराशिव जिल्हा परिषदेचे मा. अर्थ व बांधकाम सभापती* *मुकुंद दादा डोंगरे यांनी लगेच दोन्ही कडील पाहुणे बोलाविले व लगेच आपण अक्षता टाकून घेवू व सून घेऊन जावू असे सुचविले. धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी* *अजिदादा गटाचे जिल्हा अध्यक्ष महेन्द्र धुरगुडे , सरपंच महेश काका डोंगरे , आरळी गावचे सरपंच किरण दादा व्हरकट, तेथील तंटा मुक्ति अध्यक्ष * *बाजीराव बापू जाधव या सर्वांनी ही दादांच्या प्रस्तावाला होकार दिला व लगेच लग्न घाई सुरू झाली .गोरज मुहूर्तावर अक्षता टाकण्यात आल्या व संध्याकाळी शिंदे परिवारांनी आपली नवी नवेली सूनबाई घेवून मंगरूळ या गावी आले*. *या प्रसंगी इंदिरा माध्ममिक व उच्च माध्यमिक प्रशाला परिवार मंगरूळ चे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ही उपस्थित होते. दोन्ही गावातील दोन्ही कडील पाहुणे मंडळी ही फोन संदेशाच्या आधारे उपस्थित राहून वधू वराना शुभ आशिर्वाद दिले*.
*दोन्हीही कुटुंबांनी हा चांगला निर्णय घेतला. सर्व आर्थिक खर्चाला फाटा देऊनअळा घातला आणि , चांगले कार्य पार पाडले* ,*या स्तुत्य उपक्रमा बद्दल दोन्ही परिवाराचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. व यापुढे सर्वांनी हीच परंपरा चालू ठेवावी;* *आणि हीच काळाची खरी गरज आहे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा