इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वालचंदनगर येथे साद फाऊंडेशन इंदापूर या चॅरिटेबल ट्रस्ट (एन.जी.ओ)च्या वतीने संविधान सन्मान दौड- रविवार दि. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत संपन्न झाली.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून इंदापूर तालुक्याचे आमदार ,माजी मंत्री दत्तात्रय भरणे, वालचंदनगर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे , लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.नम्रता तळेकर , विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अंकुश अहिर सर, वर्धमान विद्यालयाचे उपप्राचार्य निकम सर, उबाळे सर,अहिवळे सर,वालचंदनगर चे सरपंच कुमार गायकवाड, उपसरपंच रोहित झेंडे, वालचंद विद्यालयाचे प्राचार्य सर्वंगोड सर, भारत चिल्ड्रन्स ॲकडमी चे प्राचार्य क्षिरसागर सर, व्होकेशनल एज्युकेशन लासुर्णे चे सोनवणे सर, चव्हाण सर, ग्रामपंचायत सदस्य दयानंद झेंडे, माजी उपसरपंच हर्षवर्धन गायकवाड, वालचंदनगर ग्रामपंचायत सदस्य संदीप पांढरे, राष्ट्रवादी चे गणेश धांडोरे, रासपा चे आकाश पवार, रवि जाधव, वर्धमान चे भोरे सर, रणसिंग कॉलेज च्या ज्योत्स्ना गायकवाड मॅडम, कळंब च्या पोलीस पाटील .सोनाली करडे, रणसिंग कॉलेज चे पाखरे सर, वर्धमान चे हिरवे सर,भिसे सर, ऐवळे सर, पंकज पाटील सर, शिंदे सर, व्होकेशनल चे भोसले सर वालचंदनगर पोलीस स्टेशन चे गोपनीय विनोद पवार , बीट अंमलदार- पटमास व अनेक शाळांचे शिक्षक उपस्थित होते.
प्रचंड उत्साहात झालेली ही स्पर्धा चार गटांत झाली.१७ वर्षांवरील मुलांच्या गटात १) स्वाईन निसार बागवान २) प्रेम सचिन कांबळे ३) मयुर सतिश कुंभार यांनी क्रमांक पटकावले तसेच १७ वर्षांखालील गटात १) समाधान संतोष हगारे २)प्रेम रामचंद्र चव्हाण ३)ओम सोमनाथ पाटील* या मुलांनी क्रमांक पटकावले.
त्याचप्रमाणे १७ वर्षांवरील मुलींच्या गटात १) कु.सिध्दी हनुमंत वाघमारे २) भाग्यश्री श्यामराव बिराजदार ३) यांनी तर १७ वर्षांखालील मुलींच्या गटात १) शर्वरी सचिन सावंत २) अंजली सचिन शेळके ३) तृप्ती विष्णू पवार* यांनी क्रमांक पटकावले.
उत्कृष्ट नियोजन, वालचंदनगर पोलीस स्टेशन चा चोख बंदोबस्त व नियोजन, प्राथमिक आरोग्य केंद्र लासुर्णे यांची तप्तर सेवा, अनेक शाळेच्या शिक्षकांमध्ये या उपक्रमाविषयी प्रचंड आवड , या वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेच्या सुरवातीला संविधान निर्माते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन API साळुंखे यांच्या हस्ते करून सुरवात झाली. मान्यवरांच्या हस्ते संविधान पुस्तकिचे पुजन व दिपप्रज्वलन केले. नंतर राष्ट्रीय गीत गाऊन API साळुंखे यांनी उद्देशिका वाचन करून सगळ्यांना ग्रहीत केले .
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष -सुरज वनसाळे यांनी प्रास्ताविक केले तर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ नम्रता तळेकर, API विक्रम साळुंखे सर, सरपंच गायकवाड यांनी सर्वांना प्रबोधित केले.
एकुण ९ विद्यालय, महाविद्यालय यांमधील २०० धावपटुंनी सहभाग घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष, संचालक, स्वयंसेवक, कर्मचारी, सचिव यांनी मेहनत घेतली. आणि पंचक्रोशीतील शेकडो नागरिक संविधान दौड पाहण्यासाठी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा