Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३

वाढदिवसानिमित्त- ज्येष्ठ फोटोग्राफर व पत्रकार "संजय लोहकरे "यांनी सहकारी मिञ आणि चाहत्यांची व्यक्त केली "कृतज्ञता"

 


संपादक---- हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.--9730 867 448

                             माझ्या वाढदिवसानिमित्त माझे मित्र मंडळी व आप्तेष्ट परिवार यांनी व्हाट शाप व फेसबुकच्या माध्यमातून मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे आभारी व ऋणी आहे.

              जीवनाच्या प्रवासात कधी ६० वर्षे कशी निघून गेली हे मला समजलेच नाही.त्यामध्ये ३० वर्ष तर पत्रकारिता व प्रेसफोटोग्राफी क्षेत्रातच गेली आहेत.पत्रकारिता क्षेत्रात काम करताना कधी आनंदाचे क्षण आले तर कधी कधी तर दुःखाचे हि क्षण आले होते.प्रेसफोटोग्राफर व पत्रकारितेच्या माध्यमातून अकलूजच्या विविध कार्यक्रमाला प्रसिद्धी देत असताना मला खूप आनंद व्हायचा.यामध्ये आनंदयात्रा,विज्ञान यात्रा, राज्यस्तरीय लावणी स्पर्धा, अकलूज गावची ग्रामदेवता श्री अकलाई देवीच्या विविध कार्यक्रम,आनंदनगर येथील सयाजीराजे वाॅटर पार्क,हनुमान लेझीम संघच्या लेझीम खेळाबरोबर मायकल जाॅक्सन मुंबई येथे स्वागताला जाण्याची संधी मिळाली होती.महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०१२,प्रताप क्रिडा मंडळाच्या विविध स्पर्धा, महाराष्ट्र राज्य महिला क्रिकेट स्पर्धा,अकलूज ग्रामपंचायतीचे फोटोचे काम करत असताना स्वच्छता अभियान स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात अकलूज ग्रामपंचायतीला पहिला क्रमांक मिळाला होता.त्याच बरोबर १८ लाखांचे बक्षीस ही मिळाले होते विशेष म्हणजे मी काढलेले फोटो शासनाच्या पुस्तकात प्रसिद्ध झाले आहेत.अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे सलग ३० वर्ष फोटोचे काम करत अनेक कार्यक्रमांना दैनिकांमधून बातमी व फोटो प्रसिद्ध देत.महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार महाविद्यालयास मिळाले आहेत.अशा अनेक कार्यक्रमाला फोटो काढण्याची संधी मिळाली आहे.त्यामुळे मिळालेल्या संधीचे मी सोने केले आहे.सोलापूरच्या सर्व दैनिकांनी मी काढलेले कार्यक्रमाचे फोटो पहिल्या पानावर रंगीत छायाचित्रे प्रसिद्ध केले आहेत.हे काम करत असताना मला कलाप्रेमी मा.श्री.जयसिंह मोहिते-पाटील व लोकनेते,माजी सहकार राज्यमंत्री स्व.प्रतापसिंह मोहिते-पाटील व अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मा.श्री.किशोरसिंह माने-पाटील यांची साथ मोलाची लाभली त्यामुळे हे शक्य झाले आहे.माळशिरस तालुक्यात पहिल्यांदाच अकलूज ग्रामपंचायतीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दैनिक लोकमत वृत्तपत्राच्या माध्यमातून चार पानी रंगीत विशेष पुरवणी काढण्याची संधी मला उपलब्ध झाली. आजपर्यंतच्या पत्रकारितेच्या कारकीर्दत मला शहाजहान अत्तार (माळशिरस),मिलींद गिरमे (माळीनगर),सुनिल राऊत (नातेपुते), भारत मगर (निमगाव),चंद्रकांत कुंभार (शंकरनगर),मनोज गायकवाड (श्रीपूर),सुर्यकांत भिसे (वेळापूर),विष्णु बिचकुले (गाराकुले) बी.टी. शिवशरण (श्रीपूर),अर्जुन ओव्हाळ (पुरंदावडे),स्व.प्रसाद जोगळेकर (वाफेगांव) यांची मोलाची साथ लाभली आहे.तसेच तसेच माझे वडील शरद लोहकरे व भाऊ राजीव लोहकरे यांनी मी काढलेले वृत्तपत्रासाठी फोटो रातो रात एसटीने प्रवास करून सोलापूरच्या दैनिकांच्या ऑफिसमध्ये पोहच केले आहे व पहाटे तीन वाजता अकलूजला येत होते.ऐवढी मोठी कसरत आमच्या परिवाराला दररोज करावी लागत होती.आजकाल नेटवर्क व मोबाईलमुळे खूप सोपे झाले आहे 

          जेवढे लिहावे तेवढे कमीच आहे.अशीच आपुलकी व प्रेम यापुढे ही आमच्या परिवाराच्या पाठीशी सदैव रहावे हिच अपेक्षा व इच्छा व्यक्त करतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा